आपला जिल्हा
देवरुख आगाराची बंद केलेली आरवली – माखजन – नारडूवे – पेढांबे बसफेरी पुर्ववत करावी.

आरवली – देवरुख आगाराची आरवली इथून दुपारी १२ वाजता सुटणारी माखजन नारडुवे पेढांबे ही बस फेरी शनिवार १४ अॅाक्टोबर २०२३ पासून अचानक बंद केल्यामुळे शालेय व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना आणि माखजन आठवडा बाजारासाठी येणा-या प्रवाशांना ही बसफेरी उपयुक्त ठरत होती
नारडुवे,पेढाबे या ठिकाणी जाणा-या ७० ते ७५ विद्यार्थांना या बससेवाचा थेट फायदा होत होता मात्र देवरुख आगाराने अचानक ही बसफेरी बंद केल्याने विद्यार्थी प्रवाशी वर्गातून या भोंगळ कारभारावर नाराजी व्यक्त केली जात आहे. एसटी च्या वरीष्ठ अधिका-यांनी याबाबत दखल घेवून येथील विद्यार्थी व प्रवाशांसाठी उपयुक्त ठरणारी बसफेरी पुर्ववत करण्याची मागणी करण्यात आली आहे.



