आपला जिल्हा

आ. शेखर निकम यांच्या पाठपुराव्याने बडदे कुटुंबियांना वन विभागाकडून 20 लाखाची मदत

चिपळूण - विलास गुरव

चिपळूण – मौजे तळसर, ता. चिपळूण येथील तुकाराम बडदे यांच्या वरती २३ एप्रिल २०२३ रोजी गव्यारेड्याने प्राणघातक हल्ला केला होता. या हल्यात ते गंभीर प्रमाणात जखमी झाले होते. त्यांच्यावरती अपरांत हॉस्पिटल, चिपळूण येथे ६ ते ८ दिवस उपचार सुरू होते परंतू उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, नातवंडे असा परिवार आहे.

मृत व्यक्तिच्या वारसांना शासनाच्यावतीने दिली जाणारी मदत तातडीने मिळावी यासाठी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम व वन विभागाचे अधिकारी यांनी शासनाकडे पाठपुरावा करून २० लाखांची मदत प्राप्त झाली. प्राप्त झालेली मदत मृताच्या वारसांना आमदार शेखर निकम, वन विभागीय अधिकारी दिपक खाडे, वनपाल चिपळूण राजेश्री किर, सहाय्यक वनरक्षक वैभव बोराटे, वनपाल चिपळूण दौलत भोसले, वनक्षेत्रपाल रामपूर राजाराम शिंदे, वनरक्षक कोळकेवाडी राहुल गुंठे, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष शौकत मुकादम, प्रदेश सचिव जयंत खताते,मुंडे गावचे सरपंच युवा नेते मयूर खेतले, तालुकाध्यक्ष अबु ठसाळे, मिडीयाध्यक्ष सचिन साडविलकर उपस्थितीत तुकाराम बडदे यांची पत्नी पार्वती तुकाराम बडदे व कुटुंबियांकडे १० लाखाचा धनादेश व ५-५लाखाची एफडी प्रमाणपत्र स्वरुपात देण्यात आली.

सदरची मदत तातडीने मिळावी यासाठी विभागीय वनाधिकारी चिपळूण दिपक खाडे, परिक्षेत्र वन अधिकारी राजश्री किर, सहाय्यक वनरक्षक चिपळूण वैभव बोराटे व वन विभागाचे कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले.

यावेळी तळसरचे सरपंच सिद्धी पिटले, रविंद्र म्हादे, माजी सरपंच राजेंद्र राजेशिर्के, श्रीकांत जाधव, राजेंद्र जाधाव, साहील गुरव, श्याम खेतले, सुर्यकांत पिटले, पोलीस पाटील महेंद्र कदम, वन विभागाचे कर्मचारी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button