आपला जिल्हा

राजापूर तालुक्यातील धाऊलवल्ली ते जुवे अपुर्ण बंधा-यांला कांदळवन नियमातून सुट मिळावी विधानसभा निवडणूक सहप्रमुख उल्का विश्वासराव यांचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पत्राद्वारे विनंती.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमवेत लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे उत्तर वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्या कार्यालयाकडून उल्का विश्वासराव यांना प्राप्त

राजापूर – तालुक्यातील जुवे – जैतापूर खारभूमी योजना अंतर्गत धाऊलवल्ली ते जुवे येथील अपुर्ण बंधा-याच्या कामास कांदळवण नियमातून सुट मिळाणेबाबत खारभूमी विकास विभाग रत्नागिरी यांच्याकडून वन अधिकारी रत्नागिरी यांना कळविण्यात आले होते. त्याअनुषंगाने परीमंडळ वन अधिकारी राजापूर यांच्या मार्फत वरील कामाची पाहणी करण्यात आली त्यानूसार कांदळवन नियमातून सुट देण्यात येत नसलेबाबत परीक्षेत्र वन अधिकारी यांनी कळविले आहे.

या ठिकाणी ग्रामस्थांना दुस-या गावांशी संपर्क करायचा असल्यास होडीने – बोटीने जावे लागते जे अतिशय अडचणीचे आहे.सदरची योजना पुर्ण झाल्यास १६३.८३ हेक्टर इतक्या क्षेत्रामध्ये वसलेले जुने गांव संरक्षित होणार असून शेतक-यांची आर्थिक उन्नती होण्यास मदत होईल व येथील जनजीवन सुखकर होण्यास मदत होईल शिवाय व योजनेवर खारभूमी विकास विभाग यांचा आजपर्यंत झालेला १७८.२६ कोटी रकमेचा खर्च वाया न जाता प्रत्यक्षात उपयोगी ठरणार आहे. मा. न्यायालयाच्या आदेशानुसार १२० मीटर इतकी रुंदी आवश्यक असते परंतू त्या ठिकाणी म्हणजेच सा.क्र. ५४० मी ते ५७० मी तसेच ४४० मी ते ५४० मी आणि ३४० मी ते ४४० मी या भागांमध्ये अनुक्रमे रुंदी २०-२५ मी, रुंदी ५०-६० मी रुंदी ४०-४५ मी इतकी मिळते त्यामुळे येथील अटी शिथील करुन नियमातून सुट देणायाबाबत चे पत्र लांजा – राजापूर – साखरपा विधानसभा मतदारसंघ सहप्रमुख उल्का विश्वासराव यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे. मंत्री कार्यालयाने उल्का विश्वासराव यांना याबाबत आश्वासन देत या विषयी मंत्रालयात मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमवेत बैठक आयोजित करणार असल्याचे उत्तर पत्राद्वारे दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button