आ. निकम, गोगावले यांच्या मंत्रिपदाने कोकणवासीयांना दसरा गोड..! नवरात्रात मंत्रिमंडळ विस्तार शक्य दोन्ही नावाची राजकिय वर्तुळात जोरदार चर्चा.
चिपळूण - विलास गुरव

चिपळूण – शिवसेना,राष्ट्रवादीमध्ये ५०, २५, २५ प्रमाणात वाटप-सूत्र, आमदारांच्या संख्येनुसार विधानसभा, विधानपरिषद समित्यांचं वाटप, विधानपरिषद, विधानसभेच्या २८ समित्यांवर नेमणूक होणार विस्ताराच्या बातम्या येत आहेत. अनेक मुहुर्तही ठरले मात्र विस्तार काही झाला नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे लवकरच विस्तार होईल असे सातत्याने सांगत आहेत. मात्र प्रत्यक्षात विस्तार होत नसल्याने आता आमदारांमध्ये नाराजी वाढु लागली आहे. विशेषतःशिंदे गटाचे आमदार विस्तारासाठी आग्रही आहेत.
शिंदेंना साथ देणाऱ्या १० अपक्ष आमदारांचाही त्यांच्यापैकी कोणालातरी मंत्रीपद मिळावे अशी अपेक्षा आहे. सध्या पितृपंधरवडा सुरु आहे. तो संपताच घटस्थापनेनंतर केव्हाही मंत्रीमंडळाचा विस्तार होवू शकतो. नवरात्र उत्सवात हा विस्तार होईल असे सांगितले जात आहे. १५ आणि १६ ऑक्टोबर अशा २ तारखादेखील सांगितल्या जात आहेत. दसऱ्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत राज्यमंत्रीमंडळाचा विस्तार मार्गी लागेल असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
अजितदादा गट राष्ट्रवादीचे शेखर निकम यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता असल्याची माहिती मिळत आहे, तर महामंडळाच्या समितीवर शौकत मुकादम यांचे सुद्धा नाव चर्चेमध्ये असल्याचे समजते.



