आपला जिल्हा

चिपळूण महापूर पूरनियंत्रण प्रश्नी केंद्राकडे पाठवायचा प्रस्ताव तयार करण्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आदेश

आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नांना यश

चिपळूण – चिपळूण पूर नियंत्रणाबाबत कायम स्वरूपी उपाययोजना करण्यासाठी केंद्राकडे पाठवाव्याच्या प्रस्तावाबाबत त्वरीत कार्यवाही करण्याच्या सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काल दिल्या.

आमदार शेखर निकम यांनी या प्रश्नाबाबत काल उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची मंत्रालयात भेट घेऊन ही मागणी केली होती.

या भेटींच्या वेळी चिपळूण महापूर अभ्यास गटाचे सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते संजीव अणेराव तसेच राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस जयेंद्र खताते उपस्थित होते

चिपळूण शहर आणि परिसराला महापुराच्या विळख्यातून कायमस्वरूपी वाचविण्यासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या योजनेमधून निधी मिळावा यासाठी आमदार शेखर निकम यांचा केंद्रीय बंदर, जलवाहतूक मंत्री ना.श्रीपाद नाईक तसेच केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री ना. विश्वेश्वर टूडू यांचेकडे गेली दोन वर्षे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. त्यानुसार राज्य शासनाकडून वाशिष्ठी नदीचा सखोल सर्व्हे करुन याबाबतचा प्रकल्प अहवाल रीतसर प्रस्तावासह केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवावा असे केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने आमदार निकम याना कळवले होते

त्याला अनुसरून ही भेट होती; याबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचेशी चर्चा करून प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या.

त्याप्रमाणे मंत्री अनिल पाटील यांनी याबाबत आमदार निकम यांचेशी सविस्तर चर्चा करून मदत आणि पुनर्वसन खात्याचे प्रधान सचिव याना केंद्राच्या आवश्यकतेनुसार त्वरित प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button