आपला जिल्हा

कोळकेवाडी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवण्यासाठी मंत्रालयात मदत पुनर्वसन मंत्री ना. अनिल पाटील यांच्यासमवेत आमदार शेखर निकम यांची बैठक

बैठकीला स्थानिक पदाधिकारी व प्रकल्पग्रस्तांचीही उपस्थिती

चिपळूण – तालुक्यातील कोळकेवाडी गावातील पुनर्वसित वाड्यांचे कित्येक वर्ष प्रलंबीत मुख्य प्रश्न मार्गी लावण्यासाठी सकारात्मक चर्चा आज मंगळवर दि १० ॲाक्टोबर २०२३ रोजी मंत्रालय मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आमदार निलेश लंके साहेब यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली बैठकी मध्ये कोळकेवाडी गावातील पुनर्वसित प्रकल्पग्रस्तांना शेत जमीन वाटप बाबत महत्त्व पूर्ण चर्चा करण्यात आली व पुनर्वसनाबाब प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढील आठ दिवसांत पुन्हा बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे . तसेच पुनर्वसित वाड्यान मधील नागरी सुविधा पुरविणे बाबत चर्चा करण्यात आली,पुनर्वसित कायद्या अंतर्गत वेगळा महसूल गाव या विषयाबाबत सकारात्मक चर्चा करून प्रलंबित मंजूर कामे येणाऱ्या महिना भरात मार्गी लावणार.

यावेळी विधानंसभा क्षेत्राध्यक्ष श्री.रमेश राणे,चिपळूण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष श्री.निलेश कदम, मा.सरपंच रमेश बंगाल, संजय मोहिते, महेश शिंदे , सचिन साडविलकर, सिकंदर चिपळूणकर, प्रभाकर सैतावडेकर, संबंधित विभगाचे अधिकारी वर्ग उपस्थित होते….

Related Articles

Leave a Reply

Back to top button