ठाकरे सरकारच्या काळातील विकासकामांवरील शिंदे सरकारने घातलेली बंदी हायकोर्टाने उठवली ; शिवसैनिकांमध्ये जल्लोष

चिपळूण – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासनाने मंजूर केलेल्या विकासकामांना शिंदे – फडणवीस सरकारने स्थगिती दिली होती.विद्यमान सरकारने लोकशाहीला पायदळी तुडवून महाराष्ट्रातील आमदारांवर विविध केंद्रीय तपास यंत्रणाचा दबाव आणण्याचा प्रयत्न केला.आपल्या आमदारांनी मंजूर केलेल्या सर्वसामान्यांच्या विकासकामांना स्थगिती दिली होती त्याविरोधात मा.उच्च न्यायालयामध्ये लढा देउन दाद मागण्यात आली होती. शिवसेना नेते तथा गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्करराव जाधव स्थगिती विरोधात उच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ मेहता यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती याचिकेद्वारे शिवसेनेने आपली भुनिका मांडली होती.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या व महाविकास आघाडीच्या या लढ्याला यश आले असून स्थगिती दिलेल्या विकासकामांवरील स्थगिती मा.उच्च न्यायालयाने उठविली आहे.शिवसेना नेते तथा गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्करराव जाधव यांच्यादेखील मतदारसंघातील अंदाजित ५० कोटीहून अधिक रुपयांच्या विकासकामांवरील स्थगिती उठल्यामुळे मायबाप जनतेच्या विकासकामांचा मार्ग आता मोकळा झाला आहे हा विजय खऱ्या अर्थाने सर्व सामान्य जनतेचा, लोकशाहीचा व घटनेचा आहे . पुन्हा एकदा आमदार भास्करराव जाधव यांनी या याचिकेद्वारे झुकेंगे नही असा मेसेज दिल्याने शिवसैनिकांमध्ये उर्जा निर्माण झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या सकारात्मक निर्णयाचे स्वागत करत पदाधिका-यांने जल्लोष करत उच्च न्यायालयाचे आभार मानले



