आपला जिल्हा

निवळी येथे दरड कोसळली; मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुक ठप्प

रत्नागिरी – मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी येथे दरड कोसळली आहे. यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. महामार्गावर दरड कोसळल्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून दरड हटवण्याचे कामही सध्या युध्दपातळीवर सुरू आहे. दरम्यान मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना प्रवासात मोठी अडचणीचा सामना करावा लागत आहे. सध्या रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असून या मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी येथे दरड कोसळल्याची घटना घडली आहे. संबंधित यंत्रणेकडून दरड बाजूला करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button