आपला जिल्हा

मी मरेपर्यंत लढेन पण गुढगे टेकणार नाही : आ. भास्करराव जाधव रामपूर येथे शिवसेना उबाठा पक्षाची ७२ गावची बैठक संपन्न

चिपळूण - ओंकार रेळेकर

चिपळूण – या भाजप सरकारने विविध सरकारी यंत्रणाच्या माध्यमातून विरोधकांना नामोहारम केले आहे. आम्हालाही त्रास आहे पण मी त्याचे भांडवल करीत नाही. मी रडणार नाही तर लढणारा कार्यकर्ता आहे. संघर्ष माझ्या पाचवीलाच पूजलेला आहे तरी मी खचून जाणार नाही मला सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवायच्या आहेत. माझ्यात लढण्याची क्षमता देवानेच दिली आहे. भास्कर जाधव मरे पर्यन्त लढेल पण गुढगे टेकणार नाही. कोकणच्या लाल मातीचा स्वाभिमान वेगळा आहे. आता तुम्ही मतदार संघ सांभाळा मी जिल्ह्यातील सर्व आमदार निवडून येण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे प्रतिपादन शिवसेना उबाठा नेते भास्करराव जाधव यांनी केले.

रामपूर गुढे फाटा येथे चैतन्य हॉल येथे गुहागर मतदार संघात येणाऱ्या चिपळूण तालुक्यातील ७२ गावांचा आढावा शिवसेना नेते आ. जाधव यांनी घेतला. यावेळी युवासेना कोअर कमिटी सदस्य व माजी जि. प. अध्यक्ष विक्रांत जाधव, उपजिल्हा प्रमुख रवींद्र सुर्वे, तालुका प्रमुख संदीप सावंत, उपतालुका प्रमुख संदीप चव्हाण व लक्ष्मण कोकमकर, माजी नगरसेवक फैसल कास्कर, उद्योजक वसंतशेठ उदेग, प्रभाकर जाधव, सुभाष जाधव, सुरेश साळवी, सुशीला पवार यांच्यासह सर्व महिला पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होत्या. तालुका प्रमुख संदीप सावंत व संदीप चव्हाण यांनी मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर कळंबट, रामपूर यापूर्ण जि. प. गटाचा तसेच खेर्डी, सावर्डे, कोकरे जि. प. गटातील गावांचा आढावा घेण्यात आला. पदाधिकाऱ्यांनी वाडीवर जाऊन सर्वाना सोबत घेऊन काम करा. गट तट न करता पक्षहीत डोळ्यासमोर ठेऊन काम करा. एखाद्याचा व्यक्तिगत माझ्यावर राग असेल परंतु पक्षांवर असणार नाही याची काळजी घ्या. पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या बद्दल लोकांना सहनुभूती आहे. मुखमंत्री म्हणून त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन काम केले त्यामुळे मुस्लिम बांधव आपल्या सोबत आहेत. महाराष्ट्र उद्धवजींच्या मागे उभा आहे. आज निवडणूक झाली तर मुंबई महानगर पालिकेसह आमदार व खासदारही शिवसेनेचे निवडून येतील. आज उध्वजींकडे पक्ष नाही, चिन्ह नाही तरीही २८ पक्षांच्या इंडिया आघाडीत त्यांचा सन्मान केला जातो, त्यांना आदराचे स्थान देतात कारण त्यांच्याकडे शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचे विचार आहेत. देशात सत्ता आणताना उद्धवजी महत्वाचे आहेत हे विरोधी पक्ष नेत्यांना समजले आहे. तुम्ही पाच पाच मते वेचा. लोकांजवळ बसा चर्चा करा, आपल्याला ही निवडणूक जिंकायची आहे त्या दृष्टीने तयारी करा असे आवाहन आ. जाधव यांनी केले.बैठकीचे सूत्रसंचलन पिंट्या निवळकर यांनी केले. बैठकीचे नियोजन योगेश खांडेकर, गौरव पाटेकर, प्रीतम वंजारी, सुयोग बेलवलकर आदिनी केले होते.

भाजपचे प्रथमेश भोबस्कर शिवसेनेत
भारतीय जनता पक्ष युवामोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रथमेश भोबस्कर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला शिवसेना नेते आ. भास्करराव जाधव यांनी त्यांचे स्वागत केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button