उद्याोगपती संजय भाताडे यांनी दिली आरोग्य वर्धिनी बुरंबी केंद्राला भेट

देवरुख – दि. २५ सप्टेंबर २०२३ रोजी आरोग्य वर्धिनी केंद्र बुरंबी येथे पंचक्रोशीतील सुप्रसिद्ध उद्योगपती श्री.संजय भाताडे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी संपूर्ण इमारतीची पाहणी करून रुग्णांसाठी आवश्यक वाटणाऱ्या गोष्टींची माहिती घेतली, व त्याप्रमाणे फ्युमिगेशन मशीन,मल्टी प्यारा मॉनिटर,एलईडी प्रोजेक्टर, डिलिव्हरी टेबल इत्यादी साहित्य तसेच आणखीही काही साहित्य लागले तर ते देण्याचे आश्वासन दिले. तसेच आरोग्य वर्धिनी केंद्र बुरंबी च्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. आरोग्यवर्धिनी केंद्र बुरंबीचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रायबोळे यांनी त्यांचे स्वागत केले तसेच तेर्ये गाव व पंचक्रोशी व आरोग्य वर्धिनी केंद्राच्या वतीने आभार मानले
श्री.भाताडे सारख्या दानशूर व सेवाभावी व्यक्तींमुळे आपल्या पंचक्रोशीला एक सुसज्ज व चांगली रुग्णसेवा देणारी संस्था लाभणार आहे, यापुर्वी सुद्धा कोरोना काळात त्यांनी सुसज्ज अश्या ३० खाटा आपल्या आरोग्या केंद्रा करिता दिल्या आहेत, याबद्दल श्री भाताडे यांना कर्मचा-यांनी धन्यवाद दिले.



