आपला जिल्हा

अमली पदार्थ विषयक प्रकरणे पुर्ण करुन न्यायालयातून निकाली काढण्यासाठी प्राधान्य द्यावे – गृहराज्यमंत्री योगेश कदम

मुंबई – अंमली पदार्थाबाबतची प्रलंबित प्रकरणे, अटक आरोपी आणि जामिनावर असलेले आरोपी याबाबत आढावा बैठक दि. ९ ॲाक्टोबर २०२५ रोजी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय, मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती.

अंमली पदार्थ विषयक प्रकरणात तातडीने कार्यवाही पूर्ण करणे व न्यायालयीन प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे यासाठी प्राधान्य देण्यात यावे असे बैठकीत निर्देश देण्यात आले.

ज्या शहरात किंवा जिल्ह्यात अंमली पदार्थ विषयक खटल्यांची संख्या जास्त आहे, त्या ठिकाणी विशेष न्यायालायमार्फत खटले जलदगतीने चालविण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच कमर्शियल मात्रे पेक्षा कमी पण असा अपराध वारंवार करणाऱ्या आरोपींवर कायद्यामध्ये शिक्षेची सुधारित तरतूद करण्याबाबत देखील गृह विभागास निर्देश दिले.

या बैठकीस अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या पोलीस महानिरीक्षक श्रीमती शारदा राऊत, पोलीस उपायुक्त श्री. नवनाथ ढवळे, गृह विभागाचे सह सचिव श्री. राहूल कुलकर्णी, विधी व न्याय विभागाचे उपसचिव श्री. सागर बोंद्रे तसेच गृह विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button