आपला जिल्हा

आपले सरकार सेवा केंद्राचा चिखलीत शुभारंभ ; परीसरातील नागरिकांना सुलभ सेवा देण्यासाठी कटिबद्ध- तुकाराम येडगे

संगमेश्वर – तालुक्यातील कडवई पंचक्रोशीतील चिखली येथील श्री. रघुनाथ टाकळे यांच्या दुकानाशेजारी चिखली – तांबेडी मार्गावर नव्या कार्यालय सुरु करण्यात येत आहे. परीसरातील जनतेच्या दाखल्यांची आणि शासकीय योजनांची कामे सुलभतेने व्हावी म्हणून श्री. तुकाराम येडगे आणि त्यांच्या पत्नी सौ. कुंदा येडगे हे दांपत्य “आपले सरकार” महा ई सेवा केंद्र सुरु करत असून या सेवा केंद्राचा शुभारंभ ९ ॲाक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. या सेवा केंद्राच्या माध्यमातून षेथील नागरिकांची कामे सुलभतेने करुन देण्यास आपण कटिबद्ध असल्याचे श्री. तुकाराम येडगे यांनी सांगितले. येथील कार्यालय शुभारंभ कार्यक्रमाला परीसरातील नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संचालक श्री. तुाकाराम येडगे यांनी केले आहे.

तुकाराम येडगे हे गेली २० वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत त्यांचा शासकीय कार्यालयातील जनतेसाठी काम करत असलेल्या कामांचा पाठपुरावा आणि पध्दत ही सर्व सामान्य जनतेसाठी न्याय देणारी आहे.त्यामुळे त्यांच्या सामाजिक कार्याचा अनुभवाचा या ठिकाणी येथील जनतेला नक्कीच लाभ होईल असा विश्वास व्यक्त होत आहे.

राज्यातील जनतेला सुलभ पद्धतीने सेवा मिळावी म्हणून राज्य शासनाचे आपले सरकार पोर्टल सुरु करुन जनतेचे काम अधिकच सोपे करुन दिले आहे ‘आपले सरकार’ पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतील जवळपास ४८५ सरकारी सेवा, जसे की प्रमाणपत्र मिळवणे, अर्ज करणे आणि सेवांच्या प्रगतीचा मागोवा घेणे, या ऑनलाइन उपलब्ध आहेत. हे पोर्टल महाराष्ट्र राज्य सेवा हक्क कायदा, २०१५ अंतर्गत नागरिकांना पारदर्शक, कार्यक्षम आणि वेळेत सेवा पुरवण्यासाठी सुरू करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button