संगमेश्वर तालुका भाजपतर्फे देवरूखातील आयोजित ‘मंगळागौर’ स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद

देवरूख- संगमेश्वर तालुका भारतीय जनता पार्टी पुरस्कृत मंगळागौरी स्पर्धेचे देवरुख येथील श्री लक्ष्मी-नृसिंह मंगल कार्यालयात आयोजन करण्यात आले होते. या मंगळागौर स्पर्धेला महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.
मंगळागौरी पूजन हा भारतीय विशेष करून हिंदू संस्कृतीतील महिलांचा अत्यंत प्रिय असा उत्सव आहे. त्यामुळे तालुक्यातील महिलांना एका मंचावर एकत्रित करण्याच्या उद्देशाने महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा सौ. चित्रा वाघ यांच्या मार्गदर्शना खाली या कार्यक्रमाची संकल्पना प्रत्यक्षात आणली गेली. अभूतपूर्व प्रतिसाद आणि तालुक्यात प्रथमच अशी स्पर्धा आयोजित करूनही महिलांची सभागृहातील उपस्थिती वाखाणण्या- जोगी होती. साखरपा ते माखजन असा प्रचंड विस्तार असलेल्या सुर्वदूर परिसरातील महिलांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवला. एकापेक्षा एक सरस खेळ करत सर्व संघांनी प्रेक्षकांची दाद मिळवली. नऊवारी साडी नेसून आलेल्या महिलांनी भारतीय संस्कृतीचे पारंपारिक स्वरूप जपण्याचे आणि वृद्धिंगत करण्याचे काम केल्याने आता श्रावण महिन्यात विविध ठिकाणी मंगळागौरी मोठ्या प्रमाणात आणि स्वरुपात राबविल्या जाणे नक्की झाले आहे.
त्यामुळे आयोजनकर्त्या संगमेश्वर भाजपा महिला मोर्चाचा उद्देश सर्वार्थाने सफल झाला आहे. कार्यक्रमासाठी भारतीय जनता पार्टी रत्नागिरी (द.)महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा सौ. ऐश्वर्या जठार, माजी जि.प. अध्यक्षा सौ. रश्मी कदम, रत्नागिरीच्या माजी नगरसेविका सौ. सुप्रिया रसाळ, महिला मोर्चा ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्षा सौ. प्राजक्ता रुमडे, संगमेश्वर तालुकाध्यक्षा सौ. कोमल रहाटे, राजापुर तालुकाध्यक्षा सौ. श्रुती ताम्हणकर, रत्नागिरी शहराध्यक्षा सौ. सोनाली आंबेरकर, माजी तालुकाध्यक्षा सौ. संगीता जाधव, संगमेश्वर तालुका उपाध्यक्षा सौ. शीतल दिंडे, महामंत्री सौ. नुपूरा मुळ्ये, देवरुखच्या शहराध्यक्षा सौ. स्नेहा फाटक, सरचिटणीस सौ. श्रद्धा इंदुलकर, रत्नागिरी शहर सरचिटणीस सौ. राजश्री मोरे, सुमन झगडे सरचिटणीस संगमेश्वर आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्त्या महिला उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित सर्वांचे स्वागत सौ. कोमल रहाटे यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. नुपूरा मुळ्ये यांनी केले. तसेच नियोजन समितीतील सर्व महिलानी आपापल्या जबाबदाऱ्या उत्तम रीतीने पार पाडल्याने कार्यक्रम यशस्वी झाला.



