प्रा. हरी नरके यांची आंदराजाली सभा सुरेंद्र गावस्कर सभागृहात पार पडली ; प्राध्यापकांनी नरके यांच्या ताज्या आठवणी जाग्या केल्या
मुंबई प्रतिनिधी - जनार्दन येडगे

मुंबई – मराठी ग्रंथसंग्रहालय दादर मधील सुरेंद्र गावस्कर सभागृह मध्ये शुक्रवार दिनांक १८ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ५:३० वाजता प्रा. हरी नरके यांची आदरांजली सभा पार पडली. यावेळी अध्यक्ष म्हणून मुंबई विद्यापीठ माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांची होती. व तसेच अर्जुन डांगळे, नितीन वैद्य, उर्मिला पवार, श्रावण देवरे, संभाजी भगत यांचीही प्रामुख्याने उपस्थिती होती. व सभेचे आयोजन संध्या नरे- पवार, वंदना महाजन, लता प्र. म., आशालता कांबळे, श्यामल गरुड, फुले आंबेडकरी महिला मंच, मुंबई यांनी केले होते. व डॉ.भालचंद्र मुणगेकर यांनी प्रा.हरी नरके यांचे अपूर्ण राहिलेले काम आपण सर्वांनी मिळून केले खरी आंदराजली सार्थकी होईल सांगण्यात आले. यावेळी अनेक प्राध्यापकांनी प्रा. हरी नरके यांच्या आठवणी सांगून मन प्रज्वलित केले.
प्रा. हरी नरके काळाच्या पडद्याआड
मुंबई, ज्येष्ठ लेखक, विचारवंत, समता परिषदेचे उपाध्यक्ष आणि ब्लॉगर प्रा. हरी नरके यांचे निधन ९ ऑगस्ट २०२३ रोजी झाले. एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्राध्यापक हरी रामचंद्र नरके ६० वर्षांचे होते. ते पुणे विद्यापीठात प्राध्यापक आणि महात्मा फुले अध्यासनाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. तसेच महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य म्हणून काम करत होते. प्राध्यापक नरके समता परिषदेशी संबंधित कामांसाठी पुणे येथून मुंबईसाठी रवाना झाले होते. मुंबईत येत असताना त्यांची तब्येत ढासळली. त्यांना तातडीने एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
प्रा. हरी नरके यांचे विपुल लेखन
प्राध्यापक हरी नरके यांनी विपुल लेखन केले. त्यांची महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन आणि महात्मा फुले – शोधाच्या नव्या वाटा ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांनी सामाजिक विषयांवर अनेक वर्षे ब्लॉग लिहिले. अनेक वृत्तपत्रांतून आणि मासिकांतून त्यांनी लिखाण केले.
मराठा आरक्षणाला विरोध केल्यामुळे प्राध्यापक नरके चर्चेत आले. मराठा आणि कुणबी हे दोन्ही एकच आहेत की स्वतंत्र आहेत यावरून वाद सुरू झाला. हरी नरके यांनी फुले-आंबेडकर कोश लिहिण्याचे काम हाती घेतले होते. त्यांच्या निधनामुळे हे काम अपूर्ण राहिले. डॉ. आंबेडकरांच्या साहित्याचे २६ शासकीय खंड प्रसिद्ध झाले आहेत. यातील ६ खंडांचे संपादन नरके यांनी केले होते.
हरी नरके यांनी फुले-आंबेडकर यांनी लेहीलेले कोश
१. फुले-आंबेडकर यांच्या साहित्य ग्रंथांचा व अन्य लेखनाचा चिकित्सक परिचय दिलेला आहे.
२. त्यांच्या जीवनकार्यावर आणि साहित्यावर लिहिले गेलेले सर्व ग्रंथ, प्रामुख्यानं (मराठी, हिंदी, इंग्रजी) यांचा परिचय दिलेला आहे. केवळ ग्रंथसूची नव्हे तर त्या त्या पुस्तकात नेमके काय आहे, तो किती दर्जेदार ऐवज आहे याचा शोधपर धांडोळा या कोशात आहे.
३. फुले-आंबेडकर चळवळीच्या इतिहास साधनांची, दस्तावेजांची विस्तृत माहिती या कोशात असेल. हे दस्तावेज कुठल्या व्यक्ती, संस्था, वाचनालये, ग्रंथालये यांच्याकडे उपलब्ध आहेत आणि तिथवर कसे पोहोचायचे याबाबत संपर्क-साधन व्यक्ती, संस्था यांचीही माहिती या कोशात आहे.
४. एम. फिल., पीएच.डी., किंवा पोस्ट डॉक्टरल रिसर्चसाठी देशात आणि देशाबाहेर फुले-आंबेडकर यांच्याविषयक झालेले सर्व काम कोशात नमूद आहे.
५. आणखी कितीतरी नवीन अन्य बाबी या कोशात समाविष्ट आहेत.
प्रा.हरी नरके यांच्या विविध नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेल्या लेखांचे विषय
१)अण्णा हजारे आणि आपण, २)अभिजात मराठी,
३)आरक्षण चित्रपट,
४)आरक्षणविषयक,
५)ओबीसी जनगणना,
६)ओबीसींमध्ये पेरली दुहीची बीजे,
७)घरेलू कामगारांना न्यायासाठी प्रयत्न : छगन भुजबळ
८)चळवळीतल्या सर्वांची लाडकी लेक
९)फॅसिस्ट शक्तीमुळे बहुजनांचे विभाजन
१०)मराठा आरक्षण
११)मराठी अभिजात कशी?
१२)महात्मा फुले
१३)महाराजा यशवंतराव होळकर १४)चरित्राचे प्रकाशन
१५)माझे विश्व
१६)शिक्षण
१७)संभाजी ब्रिगेड
१८)समाजशोध
अशा अनेक विषयांवर लेखन केले.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून चळवळ सुरू केली
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून हरी नरके यांनी चळवळ सुरू केली होती. मराठी भाषा ही २५०० वर्षाहून अधिक जुनी असल्याचे पुरावेही त्यांनी मांडले होते. व हरी नरके हे पुण्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर उपाध्यक्ष होते. मराठी भाषा ही संस्कृत, कन्नड, तेलुगू यांप्रमाणेच एक अभिजात भारतीय भाषा आहे. हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणून प्रा. हरी नरके यांनी योगदान दिले आहे…



