कोंढ्रण गावात भूस्खलनाने भितीचे सावट ; प्रशासन सर्तक ४७ नागरीकांचे केले स्थलांतर…
देवरुख - सुरेश सप्रे

संगमेश्वर तालुक्यातील देवरुख जवळील कोंढ्रणमध्ये सततच्या पडणा-या मुसळधार पावसामुळे येथे भुस्खलन झाल्याने नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. एका घरावर दरड कोसळलेने नुकसान झाले आहे. या घटनेमुळे तालुका प्रशासन अलर्ट मोडवर आलेले आहे. खबरदारी म्हणून कोंढ्रण गावातील १५ घरातील ४७ नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
संगमेश्वर तालुक्यातील कोंढ्रण गावातील पुन्हा स्थळ पाहणी केली असता तिथे पडलेल्या भेगांची संख्या आणि सातत्याने मोठ्या होणाऱ्या भेगा पाहता तेथील लोकांचे स्थलांतर करणे आवश्यक होते. त्यानुसार तेथील १५ कुटूंबातील ४७ लोकांना स्थलांतरीत करणेत आले. तर त्यांपैकी २८ लोकांची सोय तुळसणी विद्यालयात करणेत आली आहे. तसेच उर्वरित १९ लोकांना त्यांचे नातेवाईकांच्या घरी स्थलांतर करणेत आले आहे. सदर स्थलांतर हे पूर्ण झाले असून तेथे आपत्कालीन व्यवस्थापनाने खबरदारीची उपाय योजना करणेत आलेली आहे आणि गावातील लोकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.
या घटनेची त्वरीत दखल घेत तहसिलदार अमृता साबळे. गटविकास अधिकारी भरत चोगले. पोलिस निरीक्षक उदय पोवार यांचे सह माजी आम. सुभाष बने यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करून तातडीने स्थानिकांना स्थलांतर करणेसाठी प्रशासनाच्या मदतीने उपाय योजना केली असलेने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे..

आज ही पावसाने जोरदार हजेरी लावल्याने त्या परिसरात भेगा पडून भुस्खलन होत पडझड होणेची शक्यता आहे.
प्रशासनाने या घटनेची योग्यती दखल घेऊन तातडीने गावकऱ्यांची चांगली व्यवस्था तुळसणी येथे केली असता अनेक गावकरी प्रशासनाला कोणतीही कल्पना न देता सकाळचा नाश्ता करून परत धोकादायक ठरण्याची शक्यता असलेल्या आपल्या गावी निघून गेल्याने मदतीचा हात देणार्या प्रशासनालाच वेठीस धरत असल्याचे चित्र दिसून येत आहे..
प्रशासनाने त्या नागरीकांना परत स्थलांतरीत ठीकाणी तुळसणीत आणणेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत..



