आपला जिल्हाताज्या घडामोडी

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या संघटनात्मक बांधणीला सुरुवात ; उद्या होणा-या जिल्हा कार्यकारीणी बैठकीकडे लक्ष, संगमेश्वर तालुकाध्यक्ष कोण ?

देवरुख - सुरेश सप्रे

येत्या दोन दिवसांत संगमेशर तालुक्याला शरद पवार गटाला नवीन तालुकाध्यक्ष मिळणार आहे. त्यामुळे या इच्छुकांपैकी तालुकाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागुन राहिले आहे.

त्या दृष्टीने कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. मात्र,माजी आम. रमेश कदम व राज्य चिटणीस सुरेश बने तालुकाध्यक्ष म्हणून कोणाला पसंती देतात हे महत्त्वाचे आहे. त्यांच्या भूमिकेकडे पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

देवरूख येथिल मराठा भवन येथे उद्या दि. २९रोजी सकाळी ११ वा.जिल्हातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ची जिल्हा विस्तारीत कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकित जिल्हात संघटन वाढविणे तसेच प्रत्येक तालुका अध्यक्षांसह विविध पदाधिकारी नियुक्ती करणे या विषयी चाचपणी करणेत येणार आहे. या सभेला निरिक्षक म्हणून बबन कनावजे यांची नेमणूक करण्यात आली आहे.. त्याचे उपस्थितीत ही बैठक होणार आहे.

संगमेश्वर तालुक्यात राष्ट्रवादी यांची ताकद तुल्यबळ होती. कार्यकर्त्यांची फौज मोठी असली तरी.अनेक माजी जि.प., पं. स. सदस्य, सरपंच, माजी नगरसेवक यांचा मोठा भरणा असला तरी आम. शेखर निकम यांनी अजीत पवार यांचे उघड उघड समर्थन करीत त्यांच्या गटात प्रवेश केला. त्यामुळे सत्तेच्या मोहापाई अनेक जण निकम यांचे बरोबर गेले आहेत. पंरतू देवरूख भागातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते हे सुरेश बने यांचे हि समर्थक आहेत.. ते आता निकमांबरोबर असले तरी ते नेमकी काय भुमिका घेतात? हे पाहणे हि गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.

मात्र, आता राष्ट्रवादीमध्ये झालेल्या फुटीनंतर ही ताकद विभागली आहे. त्यात खा. शरद पवार यांच्याबरोबर येथील माजी आ. रमेश कदम यांनी जाण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडली असून शरद पवार गटाची ताकद दाखवण्या साठी जिल्हा मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. शरद पवार गट राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष पदासाठी सद्यस्थितीत विविध क्षेत्रात कार्यरत असणारे विवेकानंद उर्फ बाबा साळवी व जिल्हा बँकेचे संचालक राजू सुर्वे (अजून हि कुठल्या गटात नसलेले) यांची नाव आघाडीवर असलेची चर्चा सुरू आहे. या पदासाठी तालुक्यातील आणखी २ जण हि इच्छुक असल्याचे समजत असले तरी यामध्ये बाबा साळवी यांचे नाव आघाडीवर आहे. ते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे खंदे समर्थक आहेत. या शिवाय राज्य चिटणीस सुरेश बने यांचे समर्थक म्हणून त्यांचे नाव घेतले जाते.

सद्यस्थितीत हे चित्र स्पष्ट नसले तरी आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या अजीत पवार गटासाठी हे धोकादायक ठरू शकते.! रमेश कदम व सुरेश बने गटाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीला सुरुवात केली आहे. आता कोण कोण उघडपणे वा छुपेपणे काय भुमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button