आपला जिल्हा

कोंकणातील आंबा व काजू उत्पादक शेतक-यांच्या मागण्याबाबत अखेर कृषीमंत्र्यासमवेत बैठकीचे आयोजन आमदार डॉ.राजन साळवीच्या प्रयत्नांना यश

रत्नागिरी – आमदार डॉ.राजन साळवी यांनी केलेल्या मागणीनुसार कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतक-यांच्या मागण्याबाबत अखेर कृषिमंत्र्यान समवेत दिनांक २८ जुलै रोजी दुपारी २.००वा. मा.सभापती, विधानपरिषद दालन क्र.१४५, विधान भवन मुंबई येथे बैठकीचे नियोजन करण्यात आले आहे.

मुंबई येथे चालु असलेल्या पावसाळी अधिवेशना दरम्यान आमदार डॉ.राजन साळवी यांनी कृषी मंत्र्यांना कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतक-यांच्या मागणांबाबत पत्र दिले होते. आमदार डॉ.राजन साळवी यांनी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने कृषी मंत्री मा.ना.धनंजय मुंडे यांनी सचिव डॉ.कामरे यांना तात्काळ दिनांक २५/०७/२०२३ च्या आत सदर विषयाबाबत बैठकीचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या. परंतु बैठकीचे नियोजन न झाल्याने तसेच रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालाया समोर करण्यात आलेल्या आंदोलनामुळे पुन्हा एकदा आमदार डॉ.राजन साळवी यांनी वरील विषयावर पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन या आयुधाद्वारे कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतक-यांच्या आर्थिक अडचणींचे निवारण होणेच्या अनुषंगाने शेतक-यांच्या मागण्याबाबत बैठकीचे योजन करण्यात येणार का? अशी विचारणा केली होती.

याच पार्श्वभूमीवर कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतक-यांच्या मागण्याबाबत कृषिमंत्र्यान समवेत दिनांक २८ जुलै रोजी दुपारी २.००वा. मा.सभापती, विधानपरिषद दालन क्र.१४५, विधान भवन मुंबई येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button