साडवली ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सिसिटिव्ही बसविण्याचे गटविकारी अधिकारी यांचे आदेश

देवरुख – दि. १ जुलै २०२३ रोजी संगमेश्वर तालुकामध्ये उदय सामंत उद्योगमंत्री तथा पालकमंत्री,रत्नागिरी यांच्या जनता दरबारमध्ये अभिजीत पाटील यांनी उपस्थित केलेल्या जनहितार्थ व्यथा १ साडवली ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सिसिटिव्ही बसविणे व व्यथा क्र.२ ग्रामसभेची नोटीस प्रचार अभाव व वारंवार तहकुब होणार्या ग्रामसभा,घटता लोकसहभाग यावर चौकशी होणे संदर्भात पालकमंत्र्यांनी यावर सदर गोष्टींचे गांभिर्य लक्षात घेऊन गटविकास अधिकारी,पंचायत समिती देवरूख ता.संगमेश्वर यांना चौकशी आदेश दिले.

सदर चौकशी दि. २० जुलै २०२३ रोजी गटविकास अधिकारीयांचे अध्यक्षतेखाली पंचायत समिती देवरूख येथे पार पडली. सदर चौकशीस तक्रारदार,सरपंच,ग्रामसेवक उपस्थित होते.
सदर दोन्ही उपस्थित प्रश्नांवर चर्चा झाली, घडलेल्या घटना यांचे गांभिर्य लक्षात घेऊन मा.गटविकास अधिकारी यांनी ग्रामसभेच्या नोटीसेस जास्तित जास्त ग्रामस्थांना मिळणेकरीता व्याप्ती वाढविणे व पुढील एक वर्ष ग्रामसभेतील लोकसहभागाबाबत अहवाल ग्रामपंचायत विभाग, पंचायत समिती ता.संगमेश्वर यांना कळविणे व ग्रामपंचायत साडवली कार्यालयामध्ये सिसिटिव्ही बसविण्याचे आदेश दिले व उपस्थित व्यथा निकाली काढली…
तद्प्रसंगी तक्रारदार श्री.अभिजित पाटील यांनी ग्रामस्थांतर्फे मा.पालकमंत्री ,मा.गटविकास अधिकारी व ग्रा.पं. विभाग पंचायत समिती यांचे आभार मानले



