आपला जिल्हा
चिपळूण शहराला पाणी पुरवठा करणा-या पाईपलाईन ला गळती ; आवश्यक पाणीसाठा करून ठेवण्याचे मुख्याधिका-यांचे आवाहन
मुंबई - गोवा महामार्गाच्या कामामुळे चिपळूण नगपरीषेदेच्या पाईपलाईनला गळती

चिपळूण – चिपळूण नगर परिषदची डीबीजे कॉलेज समोरील जलवाहिनीला मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू असताना गळती लागली आहे. त्यामुळे रॉयल नगर,विरेश्वर कॉलनी, व डि.बी.जे.कॉलेज समोरील परिसर याठिकाणी उद्या दिनांक १० अॅाक्टोबर २०२३ रोजी सकाळी पाणी पुरवठा होणार नाही. तरी सदर कालावधीकरिता आवश्यक पाणीसाठा करण्याचे व पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. शिंगटे यांच्या मार्फत करण्यात आले आहे.



