आपला जिल्हाक्राईम

निलिमा चव्हाण हिच्या गुढमृत्यू प्रकरणी सखोल चौकशी करुन मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी ; संगमेश्वर तहसीलदार अमृता साबळे यांना RTI कार्यकर्ता महासंघ मुंबई यांचे निवेदन…

देवरुख – दिनांक २९ जुलै २३ रोजी दापोलीतून घरी येत असताना कु.निलिमा चव्हाण ही अचानक गायब झाली आणि त्यानंतर तिचा मृतदेह दिनांक ०१ ऑगस्ट २३ रोजी दाभोळ खाडीत मिळाला. तिचा खुन झाल्याचे आढळून आले असून गुन्हेगाराचा शोध सुरू आहे निलिमा चव्हाण हिच्या मृत्यू मुळे सर्व थरातून हळहळ व्यक्त होत आहे.

माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघ मुंबई चे संगमेश्वर तालुक्याचे वतीने आज तहसीलदार अमृता साबळे यांना सखोल चौकशी करावी व गुन्हेगाराला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करणारे निवेदन देण्यात आले..

यावेळी अध्यक्ष मनोहर गुरव, कार्याध्यक्ष शेखर जोगळे, उप संपर्क प्रमुख विजय चव्हाण, प्रचार संघटक अनिल सागवेकर, उप सर चिटणीस विजय गुरव, प्रचार संयोजक दीपक भेरे, प्रचार संयोजक विजय साळुंखे प्रचार प्रमुख एकनाथ मोहिते, सक्रिय कार्यकर्ते प्रमोद रेवणे, शिवाजी व्हाळकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button