रामनाथ पोकळे IPS यांना ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर

मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलातील कर्तव्यनिष्ठ, कार्यक्षम आणि उत्कृष्ट अधिकारी म्हणून ओळखले जाणारे रामनाथ पोकळे IPS, विशेष पोलीस महानिरीक्षक, मुंबई (Special IG) यांना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर झाल्याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पोलीस सेवेत प्रामाणिकपणा, शिस्त, कार्यतत्परता आणि उत्कृष्ट नेतृत्वगुणांच्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या श्री. रामनाथ पोकळे यांच्या कार्याची केंद्र सरकारने दखल घेत त्यांना हा बहुमान जाहीर केला आहे. त्यांच्या उल्लेखनीय सेवेला मिळालेली ही राष्ट्रीय स्तरावरील पावती असून, महाराष्ट्र पोलीस दलासाठीही ही अभिमानाची बाब आहे.
उत्कृष्ट सेवा पदक हा त्यांच्या दीर्घकालीन कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक आणि उल्लेखनीय पोलीस सेवेचा गौरव मानला जात आहे. त्यांच्या या यशामुळे मित्रपरिवार, सहकारी अधिकारी-कर्मचारी आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या सन्मानाबद्दल रामनाथ पोकळे IPS यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन! त्यांच्या पुढील सेवाकाळासाठी आणि उज्ज्वल वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.



