आपला जिल्हा

संगमेश्वर (देवरूख) तहसील कार्यालय आवाराची आणि कार्यालयामधील स्वच्छता ; स्वच्छता मोहिमेत तहसिलदार अमृता साबळे यांच्यासह महसूलचे सर्व अधिकारी व कर्मचारी झाले सहभागी

स्वच्छता हा आपल्या जीवनाचा महत्वाचा भाग- तहसिलदार अमृता साबळे

देवरुख – स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आज शनिवारी संंगमेश्वर (देवरूख) तहसील कार्यालय आवाराची आणि कार्यालयामधील स्वच्छता करण्यात आली तसेच आवारात वृक्षारोपण करण्यात आले. या स्वच्छता मोहिमेत तहसिलदार अमृता साबळे यांच्यासह महसूलचे सर्व अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

स्वच्छ भारत ही एक सामुदायिक जबाबदारी आहे. त्यासाठी केला जाणारा प्रत्येक प्रयत्न महत्वाचा आहे. आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवणे खूप महत्वाचे आहे. स्वच्छ भारत अभियान हे भारताच्या स्वच्छतेसाठी राष्ट्रीय स्तरावरील अभियान असून स्वच्छतेचा प्रश्न लक्षात घेऊन स्वच्छ भारत अभियान राबवले जात आहे. या स्वच्छ भारत अभियानांतर्गत आज शनिवारी संंगमेश्वर तहसिल कार्यालय आवाराची व कार्यालयाची सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वच्छता केली.

या मोहिमेत तहसिलदार अमृता साबळे, नायब तहसिलदार सुदेश गोताड यांच्यासह महसूल विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. या सर्वांच्या श्रमदानातून तहसिल कार्यालय आवाराची व कार्यालयाची स्वच्छता करण्यात आली. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना तहसिलदार अमृता साबळे यांनी स्वच्छता हा आपल्या जीवनाचा महत्वाचा भाग आहे. स्वच्छता ही एक चांगली सवय आहे. जी आपल्या जीवनाची गुणवत्ता वाढवते. आपण स्वतःपासून स्वच्छतेची सुरूवात करणे खूप गरजेचे आहे, असे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button