आपला जिल्हा

राजापूर-लांजा-साखरपा मतदारसंघातील बी.एस.इन.एल टॉवर संदर्भात शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी यांची बी.एस.इन.एल च्या अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा.

रत्नागिरी :- राजापूर-लांजा-साखरपा मतदारसंघातील बी.एस.इन.एल टॉवर संदर्भात तसेच राजापूर तालुक्यातील पाचल जिल्हा परिषद गटातील आजिवली येथे मंजूर असलेल्या बी.एस.इन.एल टॉवर संदर्भात आज शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी यांनी बी.एस.इन.एल चे उप महाप्रबंधक श्री.चवळी यांची भेट घेऊन सकारात्मक चर्चा केली. त्याप्रसंगी ज्युनियर टेलिफोन ऑफिसर रसाळ,विभागप्रमुख गणेश तावडे, उप सरपंच श्रीकांत कदम, ग्रामपंचायत सदस्य विशाल नार्वेकर, अनंत राणे, प्रवीण राणे, गणेश पांचाळ, प्रशांत राणे, राजेंद्र कांबळे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button