आपला जिल्हा

सार्वजनिक बांधकाम अपर मुख्य सचिव मनीषा पाटणकर – म्हैसकर यांनी केली मुंबई – पुणे मिसिंग लिंक ची पाहणी ; मुंबई – पुणे अंतर ३० मिनिटांनी कमी होणार

रायगड – मुंबई – पुणे महामार्गावरील मिसींग लिंक प्रकल्पाचे काम सध्या वेगाने सुरू असून या कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा पाटणकर – म्हैसकर यांचे बारकाईने लक्ष असून दोन महीन्यात दोन वेळा या प्रकल्पाला त्यांनी भेट देत पाहणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या या मिसींग लिंक प्रकल्पाचा सातत्याने आढावा घेत त्याला गती देण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा पाटणकर – म्हैसकर या करत आहेत त्यांना दुस-यांदा आज दि. ११ जानेवारी २०२६ रोजी या मिसिंग लिंक प्रकल्पाची पाहणी करून आढावा घेतला हा प्रकल्प लवकरच जनतेसाठी सुरु होणार असल्याने या प्रकल्पाकडे अपर मुख्य सचिव मनीषा पाटणकर – म्हैसकर यांचे विशेष लक्ष आहे.

मुंबई – पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी राज्य सरकारने मिसिंग लिंक च्या माध्यमातून साधारण १३.३ कि.मी लांबीचा बोगदा मार्ग तयार करण्याचे काम हाती घेतले. या मार्गामुळे मुंबई – पुणे अंतर ३० मिनिटांनी कमी होणार आहे. मिसींग लिंक मार्गावरील दोन्ही बोगदे पूर्ण झाले आहेत तर व्हायडक्ट १ चे काम पूर्ण झाले असून व्हायडक्ट २ चे काम पुर्णत्वाच्या अंतिम टप्प्यात आहे. व्हायडक्ट २ चे ६५० मीटर पैकी ५९९ मीटरचे काम पुर्ण झाले आहे.

व्हायडक्ट २ च्या खाली उबरखिंडीचे रणांगण आहे. या उबरखिंडीत शिवाजी महाराजांनी स्वतः लढाई लढून गमीनी काव्याने ती जिंकली होती त्या ठिकाणाला यावेळी श्रीमती पाटणकर – म्हैसकर यांनी भेट देत त्या ठिकाणाची ही पाहणी केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button