संतोष थोराडे यांची विजयाची हॅट्रिक ; पक्षफुटीनंतर कडवई गड अभेद्य राखण्यात यश.

संगमेश्वर – तालुक्यातील कडवई जिल्हा परिषद गटाचे शिवसेना ( उबाठा ) मनसे, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष थेराडे यांनी कडवई जिल्हा परिषद गटाचा गड अभेद्य राखत विजयाची हॅट्रिक साधली. शिवसेना पक्षफुटीनंतर पहील्यांदाच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत कडवई जिल्हा परिषद गट उबाठा,मनसे, वंचित बहुजन आघाडी युतीकडे राखण्यात संतोष थेराडे यांना यश मिळाले. शिवसेना उबाठा चे संतोष थेराडे आणि भाजप चे विनोद मस्के यांच्यात थेट लढत झाली. कडवई जिल्हा परिषद गटात एकूण १३२८९ मतदान झाले होते या लढतीत शिवसेना ( उबाठा ) चे उमेदवार संतोष थेराडे यांना ७३८८ , भाजप चे उमेदवार विनोद मस्के यांना ५४७३ , कॅांग्रेस चे उमेदवार आशिष सुर्वे यांना २८६, नोटा ला १४२ मते गेली शिवसेना ( उबाठा ) चे उमेदवार संतोष थेराडे १९१५ मतांचे मताधिक्य घेत दुसऱ्यांदा विजयी झाले. तर २०१२ ते २०१७ या पंचवार्षिक मध्ये धामणी पंचायत समिती गणातून निवडून आल्याने संतोष थेराडे यांचा हा तिसरा हॅट्रिक विजय ठरला आहे.
संतोष थेराडे हे कडवई जिल्हा परिषद गटाचे २०१७ चे २०२२ या दरम्यान सदस्य होते तर त्याच काळात ते जिल्हा परिषद उपाध्यक्ष व प्रभारी अध्यक्ष ही होते. मातोश्री चा विश्वासू कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे. जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदाच्या कार्यकाळात त्यांनी जिल्हा परिषद च्या माध्यमातून विविध योजनांचा थेट शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले होते. कडवई प्रभागात अनेक विकासात्मक कामे त्यांनी केली आहेत. सन २०१२ ते २०१७ दरम्यान ते संगमेश्वर पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आले होते त्यांच्या त्या उपसभापती कार्यकाळात ही त्यांनी अनेक लोकाभिमुख कामे केली होती.आता ते कडवई जिल्हा परिषद गटातून दुसऱ्यांदा निवडणूक लढवत होते या अटीतटीच्या ठरलेल्या लढतीत अखेर संतोष थेराडे यांनी बाजी मारत विजय खेचून आणला.



