संतोष थेराडे यांची कडवई जिल्हा परिषद गटात प्रचारात आघाडी ; प्रचारात सर्वाधिक पसंतीचे उमेदवार
थेराडे यांच्याकडून मतदारांच्या गाठीभेटी; गावनिहाय बैठकांना मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

संगमेश्वर – तालुक्यातील कडवई जिल्हा परिषद गटाचे शिवसेना ( उबाठा ) मनसे, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष थेराडे यांनी हातीव पं. स. गणात प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून त्यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. संतोष थेराडे हे मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेत असून त्यांच्या गावनिहाय बैठाकांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या कार्यशैलीला व विचारांना मतदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
संतोष थेराडे हे कडवई जिल्हा परिषद गटाचे २०१७ चे २०२२ या दरम्यान सदस्य होते तर त्याच काळात ते जिल्हा परिषद उपाध्यक्ष व प्रभारी अध्यक्ष ही होते. मातोश्री चा विश्वासू कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे. जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदाच्या कार्यकाळात त्यांनी जिल्हा परिषद च्या माध्यमातून विविध योजनांचा थेट शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले होते. कडवई प्रभागात अनेक विकासात्मक कामे त्यांनी केली आहेत. सन २०१२ ते २०१७ दरम्यान ते संगमेश्वर पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आले होते त्यांच्या त्या उपसभापती कार्यकाळात ही त्यांनी अनेक लोकाभिमुख कामे केली होती.आता ते कडवई जिल्हा परिषद गटातून दुसऱ्यांदा निवडणूक लढवत असून या गटातील गावागावात जाऊन ते मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. ते गावनिहाय घेत असलेल्या बैठकांना मतदार, कार्यकर्ते यांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
संतोष थेराडे हे शिवसेना ( उबाठा ) मनसे, वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार असल्याने त्यांच्या प्रचारात समन्वय दिसत असून शिवसेना ( उबाठा ) मनसे व वंचित बहुजन आघाडी चे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. मनसे जिल्हाप्रमुख जितेंद्र चव्हाण यांनी आघाडीचे सर्व पदाधिकारी सोबत घेत कडवई बाजारपेठेत रॅली काढून मतदारांपर्यॅत थेट पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेना ( उबाठा ) मनसे व वंचित बहुजन आघाडी या तीन ही पक्षांची आघाडी म्हणून एकदिलाने हे सर्व कार्यकर्ते संतोष थेराडे यांच्या प्रचारात गुंतल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे संतोष थेराडे यांनी प्रचारात सध्या मोठी आघाडी घेतली असल्याचे बोलले जात आहे.



