“गरीबांच्या आरोग्य हक्कासाठी आमदार शेखर निकम यांची विधानसभेत प्रभावी मांडणी; आयुष्मान योजनेत अधिक पारदर्शकतेची मागणी”

मुंबई – सर्वसामान्य, गरीब व गरजू नागरिकांना आयुष्मान भारत व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचा लाभ अधिक प्रभावीपणे आणि पारदर्शकपणे मिळावा, यासाठी *शेखर निकम* यांनी पावसाळी अधिवेशन 2026-27 मध्ये महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला.
योजनेअंतर्गत काही ठिकाणी उपचार खर्चाची माहिती रुग्णांना उपलब्ध होत नसल्याने लाभार्थ्यांच्या हितासाठी आवश्यक सुधारणा करण्याची गरज त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. प्रत्येक उपचारानंतर रुग्णांना मंजूर पॅकेज व खर्चाचा तपशील देणे, नियमित लेखापरीक्षण करणे, तक्रार निवारण यंत्रणा अधिक सक्षम करणे आणि लाभार्थ्यांना त्यांच्या कार्डातील वापरलेली व शिल्लक रक्कम तात्काळ कळविण्याची व्यवस्था करावी, अशा महत्त्वपूर्ण सूचना त्यांनी शासनास केल्या.
गरीब व गरजू नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेला अधिक बळकटी मिळावी आणि शासनाच्या महत्त्वाकांक्षी आरोग्य योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावा, या उद्देशाने *आमदार शेखर निकम* यांनी केलेली ही मांडणी सभागृहात विशेष लक्षवेधी ठरली.



