आपला जिल्हा

नागरिकांनी सुरक्षित वाहतुकीचे पालन करावे – सहाय्यक पोलीस आयुक्त पोर्णिमा तावरे

पुणे – पुणे महामार्ग वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त (ACP) पोर्णिमा तावरे यांनी रस्ता सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना सुरक्षित वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. या वेळी त्यांनी सांगितले की, रस्ते अपघात रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वतःपासून सुरुवात करणे अत्यंत आवश्यक आहे. दुचाकी चालकांनी हेल्मेट परिधान करणे, चारचाकी वाहनचालकांनी सीट बेल्ट वापरणे, वाहतूक सिग्नल व नियमांचे काटेकोर पालन करणे, तसेच मोबाईलवर बोलत वाहन चालवू नये आणि मद्यपान करून वाहन चालविणे टाळावे, असे आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त पोर्णिमा तावरे यांनी रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त जनतेला केले आहे.

प्रवास करत असताना वाहन तालकांनी वाहनांच्या वेगमर्यादेचे उल्लंघन, चुकीच्या ठिकाणी वाहन उभे करणे व उलट दिशेने वाहन चालविणे या कारणांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे नमूद करून नागरिकांनी जबाबदारीने वाहन चालवावे, असेही अपिल यानिमित्ताने करण्यात आले आहे.

“रस्ता सुरक्षा ही केवळ पोलिसांची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. नियम पाळल्यास अपघात टाळता येतात आणि अनेकांचे प्राण वाचू शकतात,” असे आवाहन एसीपी पोर्णिमा तावरे यांनी केले.

पुणे वाहतूक पोलीस विभागामार्फत सुरू असलेल्या रस्ता सुरक्षा अभियानात नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असेही त्यांनी शेवटी नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button