आपला जिल्हा

धोबीतलाव मधील डॉ. होरोमजी कावसजी मार्गावर दुर्गंधीचे साम्राज्य ; साचलेल्या मलनिसारणामुळे साथीच्या आजाराचा धोका

पाण्याच्या निचरा करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याची स्थानिकांची मागणी

मुंबई – मुंबई महानगरपालिकेच्या “सी”विभागातील धोबीतलाव येथील डॉ.होरोमजी कावसजी मार्गावर दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात डास वाढले आहेत. घाणीच्या साम्राज्यामुळे येथील स्थानिक नागरिक आजारी पडत आहेत.नागरिकांना ये- जा करताना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. ए.पी मंडईच्या बाहेर असलेल्या या ठिकाणी सकाळी कचरा भरण्याची गाडी लागते त्यामुळे मोठ्या प्रमाणात कचरा साचला जातो. सकाळी कच-याची गाडी गेल्यावर व्यवस्थित साफसफाई केली जात नाही. या ठिकाणी महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याने खड्डे देखील पडले आहेत तर त्या खड्ड्यांमधील साचलेल्या पाण्यामुळे परीसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे.

धोबीतलाव च्या ए.पी मंडई बाहेरचा परीसर खड्डेमुक्त करुन त्या ठिकाणी सुशोभीकरण करण्यात यावे या ठिकाणी जेष्ठ नागरिकांचा वावर होत असल्याने त्यांच्यासाठी येथील परीसरात स्वच्छ ठेवावा या परीसरातील खड्डे भरले आणि त्या ठिकाणी सुशोभीकरण केले तर या ठिकाणी जेष्ठ नागरीकांना बसण्याची सोय होणार आहे त्यामुळे या विषयाकडे महानगरपालिका प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button