संगमेश्वर रेल्वे स्थानकातील स्टॉल धारकाची मुजोरी.
पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या व कोल्ड्रिंक्स अस्वच्छ जागेवर, रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष .

संगमेश्वर – संगमेश्वर रेल्वे स्थानकातील स्टॉल धारकाने पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या व कोल्ड्रिंक्स या अस्वच्छ जागी ठेवल्याने प्रवाशांनी त्याला जाब विचारला असता हा स्टॉलधारक प्रवाशाजवळ मुजोरी करत त्याच्या अंगावर धावून आला. ही बाब कोकण रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेश बापट यांच्या निदर्शनास आणून देऊन सदर स्टॉल धारकावर कारवाई करून त्याला काढून टाकण्याची मागणी करण्यात आली . मात्र पंधरा दिवस उलटले तरीही कोणतीही कारवाई न झाल्याने संताप व्यक्त होत आहे .
कोकण रेल्वे च्या स्थानकावरील रेल्वे स्टॉल हे प्रकल्पग्रस्तना मिळणे बंधनकारक असताना ते आपल्या मर्जीतील लोकांना निविदा मॅनेज करून दिले जात असल्याचे बोलले जात आहे . हे स्टॉल घेऊन बहुतांश ठिकाणी ते परप्रांतीय लोकाना दिले जात असल्याचे दिसून येते . काही स्टॉल ज्या कारणास्तव दिले गेले आहेत त्याठिकाणी इतर व्यवसाय होत असल्याचेही बोलले जात आहे .
संगमेश्वर रेल्वे स्थानकातील असाच एक चहा चा स्टॉल कोकणी माणसाच्या नावावर असून तो एका परप्रांतीय व्यक्तीला चालवन्यासाठी दिला गेला आहे . हा व्यक्ती मुजोर असल्याच्या अनेक तक्रारी यापूर्वी समोर आल्या आहेत . सदर स्टॉल मध्ये स्वचतेचे सर्व नियम पायदळी तुडवले जात असल्याचे पहायला मिळते तर इथे मिळणारे पदार्थ ही निकृष्ट असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे .
काही दिवसांपूर्वी इथे विकले जाणारे बिस्लरी पाणी व कोल्ड्रिंक्स हे स्टॉल च्या मागे असणारी गटारावर उघड्यावर ठेवण्यात आल्याचे प्रवाशाच्या लक्षात आल्यावर त्यांनी याबाबत विचारणा केली असता हा स्टॉल धारक अरेरावी करत प्रवाशांच्या अंगावर धावत आला . आणि आपण तिथेच ठेवणार जे करायचे ते करून घ्या अशी मुजोरीची भाषा केली .
यानंतर सदरच्या प्रवाशांनी ही बाब किकन रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेश बापट यांच्या कानावर घातली . बापट यांनी तात्काळ समबंधित स्टेशन मास्तर याना कल्पना दिली मात्र त्यानंतरही दोन दिवसांनी पाहिले असता या बाटल्या तिथेच असल्याचे लक्षात येताच पुन्हा बापट याना फो करण्यात आला यावेळी बातमी साठी गेलेल्या पत्रकारांशीही या स्टॉल धारकाने हुज्जत घालत अरेरावी केली . यावेळी प्रवाशांनी या इसमास इथून कमी करण्यात यावी अशी मागणी केली बापट यांनी दोन दिवसात कारवाई करण्याचे आश्वासन प्रवाशी व पत्रकारांना दिल्याने संघर्ष टळला . मात्र पंधरा दिवस होऊनही अध्याप कारवाई न झाल्याने संताप व्यक्त होत आहे .
ही बाब राजकीय लोकांच्या निदर्शनास आल्याने आता यामध्ये राजकीय नेते उडी घेण्याची श्यक्यता निर्माण झाली आहे . सदरचा स्टॉल धारक हा मुजोर असून एन गणपती उत्सवाच्या तोंडावर संघर्ष होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत . तरी प्रवाशाच्या जीवाशी खेळ खेळणाऱ्या या मुजोर स्टॉल धारकास येथुन काढून टाकण्यात यावे व कोकण रेल्वेत असणारे स्टॉल कोण चालवत आहे याची चौकशी व्हावी अशी मागणी जोर धरत आहे .



