झो.पु.प्राधिकरणाच्या वतीने विकासक आणि वास्तुविशारद यांची बैठक ; रखडलेल्या समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील – डॅा. महेंद्र कल्याणकर

मुंबई – झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली प्राधिकरणाच्या वतीने विकासक आणि वास्तुविशारद यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पारदर्शक, जलद आणि लाभार्थीकेंद्री पुनर्वसनासाठी कटिबद्ध आहे त्यासाठी पुनर्वसन प्रकल्पांमधील अडथळ्यांचे निराकरण करण्यासाठी विकासक आणि अधिकारी यांची संयुक्त समिती स्थापन केली जाणार आहे. तसेच झोपडपट्टी पुनर्वसन योजनांना गती देण्यासाठी योजनांना अडथळा ठरत असलेल्या झोपडी धारकांना कलम ३३ व कलम ३८ अन्वये निष्कासन कारवाई ठराविक वेळेत करणे प्रलंबित असलेल्या कारवाया पूर्ण करणे. झोपडी धारकांचे पात्रतेचे परिशिष्ट ll कमीतकमी वेळेत होणे, संपूर्ण मुंबईच्या झोपडीधारकांची बायोमेट्रिक नोंदणी करण्यासाठी सर्व सक्षम अधिकार्यांना आवश्यकता पडल्यास बायोमेट्रिक एजन्सीची नेमणूक करण्यासाठी अधिकार देण्यात आले आहेत. उपजिल्हाधिकारी विशेष कक्षाच्या प्रलंबित कामांचा आढावा घेवून विकासकांनी रखडलेली कामे सूचित केल्यास तात्काळ करण्याच्या सूचना दिल्या. याबाबत विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे.
विकासकांनी माहिती व सूचना देण्यासाठी
प्राधिकरणाच्या अभियांत्रिकी विभागात एक खिडकी सुरू करण्यात आली आहे.
झोपडपट्टी पुनर्वसन योजनांच्या विविध परवानग्या ठराविक वेळेत देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर (भा.प्र.से.) यांनी सूचना दिल्या जेणेकरून सर्व झोपडपट्टी पुनर्वसन योजनांची कामे लवकरात लवकर होऊन झोपडीधारकांचे जलदगतीने पुनर्वसन होऊ शकेल



