आपला जिल्हा

तब्बल १० महीन्यांनी राजिवली ग्रामपंचायतीला कारभारी ; दिपीका सावंत यांची उपसरपंचपदी निवड

संगमेश्वर – तालुक्यातील राजिवली ग्रामपंचायत निवडणूकीत दिपीका दिपक सावंत यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यांनी आज दि. ६ मार्च रोजी आपल्या पदाचा पदभार स्विकारला. ११ मे २०२३ ते ६ मार्च २०२४ या तब्बल १० महीन्यांनतर राजिवली ग्रामपंचायतीला उपसरपंच पदाच्या निमित्ताने कारभारी लाभला असून मागील दहा महीने ग्रामपंचायतीचा संपुर्ण कारभार प्रशासकीय चक्रात अडकून पडला होता तर काही धोरणात्मक निर्णय घेता येत नसल्याने कारभार ठप्प होता.

राजिवली ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक १८ डिसेंबर २०२२ रोजी पार पडली होती. राजिवली ग्रामपंचायत सरपंच आणि उपसरपंच यांना ११ मे २०२३ रोजी रत्नागिरी लाचलुचपत विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडल्यावर कोकण आयुक्त यांनी २६ सप्टेबर २०२३ च्या आदेशान्वये राजिवली ग्रामपंचायत लाचखोर सरपंच आणि उपसरपंच यांच्यावर कारवाई करत पदावरुन काढून टाकले होते. सरपंच आणि उपसरपंच पदाच्या जागा रिक्त झाल्या होत्या रिक्त झालेल्या जागेवर दि. ६ मार्च २०२४ रोजी उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली या निवडणूकीत उपसरपंचपदी दिपीका दिपक सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

राजिवली ग्रामपंचायत पोटनिवडणूकीत उपसरपंच पदी निवड झालेल्या नवनियुक्त उपसरपंच दिपीका सावंत यांचे राष्ट्रवादी कॅांग्रेस चे रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस तुकाराम येडगे, राजिवली ग्रामपंचायत सदस्य रमेश येडगे, शैलेश घाडगे, तन्वी काळंबे, सौ. सोलकर , सौ. कदम, ग्रामसेवक सुनिल जाधव , विठ्ठल येडगे,बारकू येडगे, मनोहर घाडगे, पांडूरंग येडगे, सचिन कदम, पांडूरंग कुळ्ये,दिपक सावंत, शांताराम मोरे, मारुती कदम, पोलिस पाटील संदीप कदम, शांताराम निकम, दिपक घाडगे, सोनाली कदम यांनी अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Back to top button