देवरूख – संगमेश्वर बसला लोवले येथे अपघात; बस दरीत कोसळली; १३ प्रवाशी जखमी

संगमेश्वर- देवरूखहून संगमेश्वरकडे जाणारी बस लोवले येथे दरीत कोसळून अपघात घडला. यामध्ये बसमधील १३ प्रवाशी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. हा अपघात सोमवारी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडला.
देवरुख आगाराची बस देवरूख येथून संगमेश्वरकडे जात असताना बसला लोवले येथे मोरीजवळ अपघात झाला. ही बस दरीत कोसळली. या अपघातामध्ये बसमधील एकूण १३ प्रवासी जखमी झाले आहेत. यामध्ये सुमित पांडुरंग संसारे, रा दापोली, साक्षी शंकर लिंगायत वय 41 रा, तुरळ, सतीश शिवराम करदोडे कोंडअसुर्डे, शेखर सदाशिव चव्हाण, संगमेश्वर, ज्योतिबा श्रीपती पवार वय 35 वर्षे रा देवरुख, निवृत्ती रामकृष्ण माने, रा सावर्डे, दिलीप बारकू लेवारे, रा नाशिक, बबन कृष्णा पवार, फणसवळे, रुद्र संतोष चव्हाण 12, कोळंबे, अतिक रहमान पटेल,पांडुरंग संसारे, दापोली, सिद्धी संदीप घडशी माभळे, शिवानी खातू, संगमेश्वर हे प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.



