रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नवीन तीन कायद्यां संदर्भात आगामी १०० दिवसात प्रत्येक पोलीस ठाण्याचा हद्दीमध्ये घेण्यात येणार विविध कार्य शाळा.

रत्नागिरी – भारतीय संसदेने भारतीय न्याय संहिता २०२३, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ व भारतीय साक्ष अधिनियम २०२३ हे तीन नवीन कायदे पारित केले असून त्यांची अमल बजावणी दिनांक ०१/०७/२०२४ पासून सुरू झाली आहे.
याच अनुषंगाने अपर मुख्य सचिव (गृह), यांच्या दिनांक ०८/०१/२०२५ च्या अ.शा. पत्रानुसार, भारतीय न्याय संहिता २०२३, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ व भारतीय साक्ष अधिनियम २०२३ ह्या नवीन तीन कायद्यांचा प्रसार व प्रसिद्धीसाठी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आगामी १०० दिवसांत प्रत्येक पोलीस ठाण्याचा हद्दीमध्ये दिनांक १६/०१/२०२५ पासून विविध कार्य शाळा (workshop) आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
या कार्य शाळांचे प्रामुख्याने खालील स्वरुपात विभाजन असणार आहे-
१) ग्राम पंचायत स्तरावर ३०%
२) तालुका स्तरावर ६०% व
३) जिल्हा स्तरावर १०%
या कार्य शाळेत मार्गदर्शक म्हणून विधी महाविद्यालयाचे प्राचार्य/ प्राध्यापक, नामांकित कायदेतज्ञ, सरकारी वकील आणि या विषयातील अभ्यासक यांना निमंत्रित करण्यात येणार. या कार्य शाळेमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी, विधी तज्ञ, विशेष सामाजिक घटक आणि नागरिकांचा समावेश असणार आहे.
या कार्य शाळांचे पोलीसांमार्फत व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील करण्यात येणार आहे. याच अनुषंगाने काल दिनांक रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आतापर्यंत २१ कार्य शाळा आयोजित करण्यात आलेल्या आहेत.



