खा.विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली सह्याद्री बचाव न्यायहक्क समितीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाला पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांनी दिली भेट
कुंडी व निगुडवाडी येथील जमिनीचा घोटाळा प्रकरणी पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले चौकशीचे आदेश

रत्नागिरी – संगमेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करणाऱ्या अदानी ग्रुप विरोधात खा.विनायक राऊत यांनी जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर उपोषण केले होते. या उपोषणाची दखल घेत पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषण कर्त्यांच्या समस्या जाणून घेत सदरील विषयाची चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
संगमेश्वर तालुक्यातील कुंडी व निगुडवाडी येथील जमिनीचा घोटाळा सह्याद्री बचाव न्यायहक्क समितीने बाहेर काढला होता प्रमुख तक्रारदार दिनेश कांबळे यानी शिवसेना सचिव खा. विनायक राऊत यांची भेट घेऊन हा घोटाळा कसा झाला आहे याची माहिती दिली होती.त्याच्या आधारे खासदार विनायक राऊत यांनी न्याय मिळाला नाही म्हणून उपोषण करण्याचे निर्णय घेतले त्या प्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर उपोषण केले.अदानी ग्रुप आणि रायपूर राजनांदगाव वरोरा ट्रान्समिशन लिमिटेड कंपन्या व त्यांचे दलाल यांच्या संगनमताने संगमेश्वर तालुक्यात शेकडो हेक्टर शेतजमीन लाटल्याचा प्रकार खा. विनायक राऊत यावेळेस पालकमंत्री यांच्याशी चर्चा करताना मांडला.यावेळी समिती गठीत करुन चौकशी केली जाईल.मंत्रालयात यां विषयी मिटिंग लावली जाईल यां आश्वसना नंतर हे उपोषण स्थगित करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी देवेद्र सिंह,पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी,प्रांत जीवन देसाई,आदी उपस्थित होते.



