आपला जिल्हाताज्या घडामोडी

पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्या हस्ते संगमेश्वर शिवसेना कार्यालयाचे उदघाटन ; या कार्यालयातून जनतेच्या सामाजिक कार्याला प्राधान्य द्या – पालकमंत्री ना.उदयजी सामंत

संगमेश्वर – रत्नागिरी विधानसभा मतदार संघातील जनतेची कामे जलद गतीने व्हावीत तसेच लोकांशी संपर्क व्हावा.यासाठी आज रत्नागिरीचे पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्या हस्ते शिवसेना संगमेश्वर संपर्क कार्यालयाचे उदघाट्न करण्यात आले.यामुळे येथील कार्यकर्त्यांमध्ये वेगळे चैतन्य निर्माण झाले आहे.याठिकाणी कार्यालय उभे राहावे ही मनापासूनची ईच्छा होती मात्र त्याला आजचा स्वातंत्रदिनाचा मूर्त मिळाला माझ्या मतदार संघातील लोकांच्या अडीअडचणी साठी हे कार्यालय उपयोगी पडेल असे पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी यावेळी सांगितले

यावेळी जिल्हाप्रमुख राहुल पंडित, उपजिल्हाप्रमुख राजेश मुकादम, संगमेश्वर तालुका प्रमुख प्रमोद पवार, रत्नागिरी तालुका प्रमुख बाबू म्हाप, सिद्धेश ब्रीद, विवेक शेरे, महेश देसाई, संदीप राहाटे, अतिश पाटणे, जमूरत अलजी, तैमूर अलजी, संजय खातू,आदी आणि प्रमुख पदाधिकारी, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button