ताज्या घडामोडी

मंत्रालय व विधानभवन परीसरातील अनाधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी : रासप जिल्हाध्यक्ष सुरेश येडगे

अनाधिकृत फेरीवाल्यांचा पदपथावर कब्जा

मुंबई – ए विभागाच्या हद्दीतील अनाधिकृत फेरीवाल्यांचा सुळसुळाट वाढला आहे. नरिमन पॉइंट मध्ये सर्रास गॅस, शेगडी, स्टोव्ह वापरून अनाधिकृतपने धंदा केला जात आहे. रामनाथ गोएंका मार्गावर अनेक अनाधिकृत फेरीवाले वाढल्यामुळे नागरीकांना ये जा करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनाधिकृत फेरीवाल्यांनी मा. उच्च न्यायालयाचे नियम पायदळी तुडवून पदपथावर बस्तान मांडले आहे.

मरीन ड्राईव्ह पोलिस ठाणे हद्दी मध्ये नरिमन पॉईंट येथील रामनाथ गोएंका मार्ग मधील एक्स्प्रेस टॉवर च्या बाजूला निर्मल बिल्डिंग च्या कॉर्नर ला काही अनाधिकृत फेरीवाल्यांनी मज्जाव मांडला आहे. तसेच मंत्रालय जवळील खाऊ गल्ली, इयर इंडिया जवळील खाऊ गल्ली,
ओबेरॉय जवळील खाऊ गल्ली, मफतलाल सेंटर अशा अनेक ठिकाणी गॅस ,सिलिंडर, स्टोव्ह वापरून अनाधिकृतपने धंदे केले जात आहेत.

महापालिका आयुक्तांचे कारवाईचे आदेश 

सध्या मुंबई मध्ये गॅस, सिलिंडर, स्टोव्ह वापरण्यावर कारवाई चालू आहे पण या ठिकाणच्या काही अनाधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई का होत नाही? मुंबई महापालिका आयुक्त साहेबांनी कारवाईचे आदेश देऊन सुद्धा व अनेक वेळा नागरिकांनी तक्रार केल्या असून सुद्धा ठोस कारवाई महापालिका व पोलिस प्रशासन करत नाही. काही वेळेस तक्रारी केल्या तर तेवढ्या पुरती कारवाई केली जाते. परत परिस्थिती जैसे थे होते.

अनधिकृत फेरीवाल्यांमुळे गर्दी होऊन सर्व नागरिकांना ये जा करताना चहा वाला व अनेक अनाधिकृत फेरीवाल्यांमुळे गर्दी होऊन नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या गर्दीचा फायदा घेऊन गर्दुल्ले पाकीट मार व मोबाईल चोर अशा घटना घडत आहे. रामनाथ गोयंका मार्गावरील सर्व अनाधिकृत फेरीवाल्यांवर मरीन ड्राईव्ह पोलिस ठाणे व ए विभाग महापालिका प्रशासनाने कारवाई करून सर्व सामान्य नागरिकांचा पदपथ ये-जा करण्यासाठी खुला करण्यात यावा अशी अनेकवेळा मागणी नागरिकांनी केली आहे.

न्यायालयाच्या आदेशाला हरताळ

विशेष म्हणजे न्यायालयाच्या आदेशानुसार शाळा,मंदिर, कॉलेज, रुग्णालय अशा ठिकाणी १०० मीटर च्या आतमध्ये अनाधिकृत फेरीवाल्यांना मनाई आहे तर मग सर्रासपणे रामनाथ गोयंका मार्गावर स्टोव्ह लावून चहा चा अनाधिकृत धंदे चालू आहेत. यावर पोलिस व महापालिका ठोस का कारवाई करत नाही? असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.

 

नरिमन पॉइंट हद्दिमधील रामनाथ गोएंका मार्गावर अनाधिकृत फेरीवाल्यांचा सुळसुळाट वाढला आहे. यामुळे पोलिस व महापालिका प्रशासनाने नरिमन पॉइंट मधील सर्व अनाधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करून पदपथ मोकळे करावे. – सुरेश येडगे – दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष

नरिमन पॉइंट हद्दीमधील अनाधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई चालू आहे. रामनाथ गोएंका मार्गावर ठोस कारवाई करू.
सलीम अन्सारी – वरीष्ठ निरिक्षक अतिक्रमण विभाग – ए विभाग

Related Articles

Leave a Reply

Back to top button