राजिवली ग्रामपंचायत जलजीवन मिशन विशेष ग्रामसभा सपंन्न ; येडगेवाडी योजनेत तांत्रिक मुद्दावर चर्चा तर दोन्ही गावातील कामे पावसाळनंतर सुरु होणार.

संगमेश्वर – तालुक्यातील राजिवली ग्रामपंचायतीची जलजीवन मिशन विषयसाठी दि.९ जुलै २०२४ रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते या विशेष सभेत विविध विषयावर चर्चा करण्यात आली या सभेला बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
येडगेवाडी नळपाणी योजना कामासाठी खोदण्यात आलेल्या तिवटी येथील विहीरत मार्च, एप्रिल, मे महीन्यात पुरेल इतके पाणी उपलब्ध नसल्याची माहीती पाणी पुरवठा उप अभियंता आर.एल लठाड यांनी ग्रामसभेत दिली आहे. ग्रामीण पाणी पुरवठा तत्कालीन उप अभियंता अविनाश जाधव यांनी २९ मार्च २०२४ रोजी केलेल्या ( Yeild Test ) मध्ये २४ तासात ३५०० लिटर पाणी उपलब्ध होत असल्याचा अहवाल कनिष्ठ भूवैज्ञानिक यांच्याकडे पाठवून पाणी पातळी तपासून विहीर बांधकामाबाबत अभिप्राय मागितला होता.त्या पाणी पातळीवर पाणी पुरवठा उप अभियंता आर.एल लठाड यांनी या ग्रामसभेत शिक्कामोर्तब करत येडगेवाडी नळपाणी योजना कामातील तिवटी येथील विहीरीच्या पाणी पातळी बाबत दि.२९ मार्च २०२४ रोजी तत्कालीन उप अभियंता अविनाश जाधव यांनी दिलेल्या अहवालावर आर.एस लठाड यांनी या सभेत सहमती दर्शवत येडगेवाडीत पाणी मुबलक नसल्याची कबुली दिली.
येडगेवाडीची २०११ च्या जनगणनेनुसार ५०९ लोकसंख्या आहे तर २०५३ ला संकल्पीत लोकसंख्या ९५९ होते प्रती माणूस ५५ लिटर या प्रमाणे येडगेवाडीला दररोज ६३ हजार लिटर पाण्याची गरज आहे मात्र तिवटी येथील विहीरीत दररोज ३५०० लिटर पाणी उपलब्ध होत असल्याचे मार्च अखेरच्या पाणी पुरवठा विभागाच्या अहवालात स्पष्ट झाले आहे. संतोष येडगे यांनी पाणी पुरवठा विभागाच्या माहीतीचा आधारे ही तांत्रिक माहीती ग्रामसभेत अवगत केली.
येडगेवाडी सुधारीत नळपाणी योजना कामासाठी १ कोटी ३६ लाख ३६ हजार ४०१ रुपये इतकी रक्कम मंजूर असून या योजनेच्या मुळ अंदाजपत्रकात पाचांबे गायकवाडवाडी या ठिकाणी विहीरीची जागा निश्चित करण्यात आली आहे. येडगेवाडी नळपाणी योजनेची पाचांबे येथून ४ कि.मी लांबी असून १८ एच.पी चा पंप आवश्यक असल्याचे यावेळी पाणी पुरवठा अभियंता श्री.लठाड यांनी सांगितले. येडगेवाडी नळपाणी योजना सौरऊर्जेवर करावी अशी मागणी संतोष येडगे यांनी ग्रामसभेत केली त्यावर उप अभियंता आर.एल लठाड यांनी सौरऊर्जेासाठी दोन गुंठे जागा आवश्यक असल्याचे सांगितले. गडनदी धरणाजवळ जलसपंदा विभागाची संपादीत जागा विहीर आणि सौरउर्जा पॅनलसाठी वापरण्यास जलसपंदा विभागाने नाहरकत प्रमाणपत्र दिल्याची माहीती संतोष येडगे यांनी या सभेत दिली.
जलजीवन मिशन विशेष ग्रामसभेत येडगेवाडी सुधारीत नळपाणी योजना विहीर बांधकामाबाबत चर्चा करण्यात आली या चर्चेत रामचंद्र येडगे यांनी तिवटी आणि पायरी येथील दोन विहीरी एकत्र करुन नळपाणी योजना करण्याची मागणी केली. मात्र ती मागणी संतोष येडगे आणि सहका-यांनी फेटाळून लावत मुळअंदाजपत्रकानुसार संपुर्ण येडगेवाडीला मुबलक पाणी मिळावे अशा पध्दतीची योजना करण्याची मागणी या ग्रामसभेत केली.
राजिवली ग्रामपंचायत जलजीवन मिशन सभेत विविध विषयावर चर्चा झाली काही विषयावर वादग्रस्त चर्चा होत असल्याने सभेचे अध्यक्ष तथा सरपंच यांनी दोन्ही बाजू ऐकून घेत आणि वादग्रस्त आणि नॅान टेक्निकल विषय चर्चेला येत राहील्याने सरपंच यांनी सभा तहकूब करत तांत्रिक बाबींचा विचार करुन वरीष्ठ कार्यालयाने निर्णय घेण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. येडगेवाडी नळपाणी योजना कामातील तांत्रिक बाबी लक्षात घेता आणि पाण्याची गरज लक्षात घेता पाणी पुरवठा विभाग आणि जिल्हा परीषद प्रशासन यांना निर्णय घेणे क्रमप्राप्त होणार असून येडगेवाडी नळपाणी योजनेविषयीचा निर्णय आता जिल्हा परीषद प्रशासनाने घ्यायचा आहे असे या सभेत ठरवण्यात आले.
राजिवली गावासाठी नळपाणी योजनेत चार झोन बनवले आहेत राजिवली शिर्केवाडी विहीर होण्यापुर्वीच पाईपलाईन टाकून ठेवल्याचा मुद्दा राजेंद्र शिर्के आणि दिव्या शिर्के यांनी या ग्रामसभेत मांडला तर जलजीवन मिशन चे शिर्केवाडी चे काम चुकीच्या पध्दतीने झाल्याने त्याचा फटका ग्रामस्थांना बसत असल्याचा मुद्दा या वेळी मांडण्यात आला.
राजिवली घाडगेवाडी साठी विहीर करण्यापुर्वीच पाईपलाईन टाकून ठेवल्याने ग्रामपंचायत सदस्य शैलेश घाडगे यांनी प्रश्न उपस्थित केला काळंबेवाडीसाठी टाकण्यात आलेल्या पाईपलाईनची ही तपासणी करावी असा मुद्दा या सभेत मांडण्यात आला. पाणी पुरवठा उप अभियंता आर.एल लठाड यांनी या कामातील पाईपलाईन आणि इतर कामांची पाहणी करुन योग्य ती कार्यवाही करु असे आश्वासन या सभेत दिले आहे.
राजिवली बौध्दवाडी येथील नळपाणी योजना कामातील विहीर, टाकी आणि पाईपलाईन च्या कामाबाबत राजेंद्र जाधव, विलास कदम, सचिन कदम यांनी मुद्दा मांडला या कामाबाबत ग्रामसभेत चर्चा करण्यात आली आणि पावसाळनंतर काम सुरु करणार असल्याचे या सभेत पाणी पुरवठा उप अभियंता आर.एल लठाड यांनी सांगितले.



