ताज्या घडामोडी
मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतले करवीर निवासिनी आई अंबाबाईचे दर्शन; कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते सत्कार

कोल्हापूर – शिवसेना पक्षाच्या राष्ट्रीय महाअधिवेशनाकरिता कोल्हापूर दौऱ्यावर असताना उत्पादनशुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज महालक्ष्मी मंदिरात जाऊन आई अंबाबाईचे मनोभावे दर्शन घेतले. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन ही नेहमीच समाधान देणारी अनुभूती असते, अशी भावना ना.शंभूराज देसाई यांनी यावेळी व्यक्त केली. राज्यातील जनतेला उत्तम आरोग्य आणि सुख-समृद्धी लाभो, अशी प्रार्थना ना.देसाई यांनी याप्रसंगी आई अंबाबाईच्या चरणी केली.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडून मंत्री शंभूराज देसाई यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते आणि भाविक बंधू-भगिनी उपस्थित होते.



