आपला जिल्हा

मुंबई परीमंडळ १ चे पोलीस उपायुक्त डॅा.प्रवीण मुंढे यांना उच्चश्रेणीत बढती ; संकटकाळात जनतेसाठी मैदानात उतरणारे खाकी वर्दीतील डॅाक्टर

मुंबई – बृहन्मुंबई पोलीस दलातील दक्षिण मुंबई परीमंडळ १ चे पोलीस उपायुक्त डॅा. प्रवीण मुंढे यांना उच्चश्रेणी बढती देण्यात आली आहे. डॅा.प्रवीण मुंढे हे २०१२ च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी आहेत.त्यांच्या बदलीचे आदेश नसल्याने ते सध्या मुंबई परीमंडळ १ चे उपायुक्त म्हणूनच काम करणार असल्याचे शासनाच्या आदेशात म्हटले आहे. पोलिस उपायुक्त डॅा.प्रवीण मुंढे यांच्या उच्चश्रेणी बढतीमुळे त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

डॅा.प्रवीण मुंढे यांनी परीमंडळ १ च्या उपायुक्त पदाचा पदभार स्विकारल्यापासून दक्षिण मुंबईत शांतता प्रस्थापीत करण्यासाठी चांगले काम केले आहे तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध गुन्ह्यांची उकल करण्यात आली.

डॅा.प्रवीण मुंढे यांनी रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून लक्षणीय कामगिरी केली आहे. कोरोना काळात वेळप्रसंगी डॅाक्टर म्हणून जिल्हावासीयांची सेवा करेल जिल्ह्यातील जनेतेने घाबरुन जावू नये असा धीर देत आश्वासक कामगिरी करुन दाखवली होती. त्यांच्या डॅाक्टर म्हणून धावून येण्याच्या आवाहनाला जिल्ह्यातील जनेतेने उदंड प्रतिसाद देत कोरोना संकटावर मात केली होती.

Related Articles

Leave a Reply

Back to top button