शासनाचेच मानधन घेऊन विकसित भारत संकल्प यात्रेला सरपंचांचा विरोध ; भाजपा चिपळूणतर्फे कडक कारवाईचे तहसीलदारांना निवेदन

चिपळूण – केंद्र सरकारच्या लोक कल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने देशपातळीवर सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथाला शासनाचेच मानधन घेऊन काही गावातील सरपंच रथ रोखणे अथवा शासनाच्या विरोधात भूमिका घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य जनतेकरीता राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती गावातील नागरिकांपर्यंत पोहोचू नये म्हणून प्रयत्न करत आहेत, या सरपंचांवरती कडक व कठोर कारवाई व्हावी यासाठी भारतीय जनता पार्टी चिपळूण तालुक्याच्या वतिने तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर यांनी तहसीलदार प्रवीण लोकरे, गट विकास अधिकारी उमा घारगे पाटील यांना निवेदन दिले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष रामदास राणे, जिल्हा उपाध्यक्ष आशिष खातू , महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सुरेखा खेराडे, जिल्हा चिटणीस सचिन शिंदे, मधुकर निमकर, जिल्हा निमंत्रित सदस्य विनोद सुर्वे, सहकार सेल जिल्हा संयोजक रत्नदीप देवळेकर, विस्तारक प्रसन्ना जाधव, शहराध्यक्ष श्रीराम शिंदे, महिला मोर्चा शहराध्यक्षा शितल रानडे, महिला मोर्चा शहर सरचिटणीस स्नेहा वैशंपायन, कार्यकारणी सदस्य सारिका भावे, तालुका सरचिटणीस एकनाथ सहस्रबुद्धे, शहर सरचिटणीस निनाद आवटे, विनायक वरवडेकर, अनुसूचित जाती मोर्चा शहर अध्यक्ष अमित चिपळूणकर, अनुसूचित मोर्चा तालुकाध्यक्ष योगेश नलावडे, शहर उपाध्यक्ष महेश कांबळी, निखिल रतावा, सहकार सेल तालुका संयोजक संजय कांबळे, युवा मोर्चा शहराध्यक्ष संदिप भिसे, ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष प्रणय वाडकर, बूथ प्रमुख संदिप बोंडकर आणि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.



