शहराला स्वच्छ पाणी द्या, अन्यथा आंदोलन: रमेशभाई कदम

चिपळूण – शहरातील खेंड, कांगणेवाडी, बडदेवाडी, गोवळकोट, गोवळकोट रोड, बाजारपेठ, पेठमाप, महालक्ष्मी नगर या भागामध्ये सध्या मसूळ पाणी नगर पालिकेकडून पुरवले जात आहे. नगर पालिकेने तातडीने बंधारा बांधावा व नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवाव्ो, अशी मागणी माजी नगराध्यक्ष, माजी आमदार रमेशभाई कदम यांनी केले आहे.
तातडीने पालिकेने बंधरा बांधवा, शहराला स्वच्छ पाणी पुरवावे, अन्यथा पालिकेवर धडक देऊ, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
शहरातून वाहणाऱ्या वाशिष्ठी नदीचा गाळ काढला गेला आहे. परिणामी पाणी व्ोगाने वाहून समुद्राला मिळत आहे.
त्यातच भरती असल्यामुळे भरतीचे पाणी आतमध्ये शिरत आहे. यामुळे मचूळ पाण्याचा पुरवठा नागरिकांना होत आहे. शहरातील महालक्ष्मी नगर, पेठमाप, बाजारपेठ, गोवळकोट रोड, गोवळकोट, बडदेवाडी, कांगणेवाडी, खेंड या भागात सध्या नळाला मचूळ पाणी येत आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी नगर पालिकेने तातडीने बंधारा बांधण्याचे काम हाती घ्याव्ो, कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधल्यास मचूळ पाण्याची समस्या दूर होईल, नगर पालिकेने तातडीने हे काम हाती घ्यावी, बंधारा त्वरित बांधावा, अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा रमेशभाई कदम यांनी दिला आहे.



