आपला जिल्हा

रिक्षा चालकांनी श्रमदानातून भरले कडवई चिखली रस्त्यावरील खड्डे ; बांधकाम विभागाचे दुर्लक्ष.

वेळप्रसंगी रिक्षा संघटना रस्त्यावर उतरणार - मिलींद चव्हाण

संगमेश्वर – तालुक्यातील तुरळ- कडवई – चिखली रस्त्याचे काम भर पावसात केल्याने पहिल्या पावसात रस्त्याला खड्डे पडू लागले आहेत. यासंदर्भात रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवूनसुद्धा दुर्लक्ष करण्यात आले परिणामी रस्त्याला ठिकठिकाणी खड्डे पडू लागले आहेत.रिक्षा संघटनेच्या सदस्यांनी या त्रासाला कंटाळून काही मोठे खड्डे श्रमदानातून भरले आहेत मात्र तरीही बांधकाम विभागाने याकडे लक्ष न दिल्यास रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा रिक्षासंघटनेच्या वतीने अध्यक्ष मिलिंद चव्हाण यानि दिला आहे .

कडवई – तुरळ – चिखली रस्त्याचे सन २०२० मध्ये झाल्यानंतर वर्षभरातच हा रस्ता खराब झाला . यानंतर रिक्षासंघटनेने आवाज उठवल्यानंतर या रस्त्याच्या नसविन कामाला जवळजवळ अडीच कोटी ची तरतूद करत नवीन कामाला मंजुरी देण्यात अली . लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर श्रेयाच्या लढाइत याचे दिमाखात उदंघाटन करण्यात आले . मात्र यानंतर याचा पाठपुरावा न झाल्याने ठेकेदाराने कामात दिरंगाई केली व भर पावसात काही काम उरकले .

रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने ठेकेदाराला फोन द्वारे रस्ता दुरुस्ती संदर्भात चर्चा करण्यात आली होती तसेच बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील कल्पना देण्यात आली होती तरीही दोघांनी रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले परिणामी खड्डे मोठे होत गेले.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याला सर्व ठिकाणी गटारे नाहीत व काही ठिकाणी मोऱ्या काढणे गरजेचे होते परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत असते.वाहत्या पाण्याने रस्त्याचे डांबरीकरण ठिकठिकाणी उखडू लागले आहे.नागरिकांना या खड्ड्यातून प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या कटकटींना कंटाळून पाऊस थांबताच रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने खड्डे भरण्याचे काम करण्यात आले आहे.

रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने ठेकेदाराला समबंधीत दुरावस्थेबाबत कल्पना आली होती तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने बांधकाम विभागाला देखील कल्पना देण्यात आली होती तरीही दुर्लक्ष केले गेले .

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या भूमिकेबद्दल नागरिकांमध्ये नाराजी पहावयास मिळत आहे.रस्ते दुरुस्तीला होत असलेला विलंब व नागरिकांना होणार त्रास पाहून उपाध्यक्ष संदीप चिले, श्रीकांत डिंगणकर, तुषार कदम, महेश कानाल,उदय चाचे,नितीन कानाल, अनिकेत पवार,सुधीर पंडव,रफिक काझी यांनी एकत्र येत तुरळ कडवई चिखली मार्गावरील खड्डे भरण्याचे काम स्वखर्चाने केले.रिक्षाचालकांच्या या सामाजिक बांधिलकीचे नागरिकांतून कौतुक होत आहे

मात्र तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्यास रिक्षा संघटना लोकशाही पद्धतीने रस्त्यावर उतरेल असा इशारा अध्यक्ष मिलिंद चव्हाण यांनी दिला आहे .

Related Articles

Leave a Reply

Back to top button