अधिवेशन संपताच जलसंपदा कोकण प्रदेश मुख्य अभियंता मिलींद नाईक येणार कोकण दौ-यावर ; रत्नागिरी जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पाची पाहणी करत धेणार कामांचा आढावा.

संगमेश्वर – कोकणातील पर्यायाने रत्नागिरी जिल्ह्यातील पाणी प्रश्नावार मात करण्यासाठी जलसंपदा विभागाकडून मध्यम आणि लघु अशा २२ प्रकल्पांची निर्मीती करण्यात आली आहे यामध्ये काही प्रकल्पांची कामे अंतिम टप्प्यात आहेत तर काही प्रकल्प शासनाच्या लालफितीच्या कारभारात अडकले आहेत प्रस्तावित असलेले आणि शासनाचा निधी खर्च झालेले प्रकल्प पुर्ण करण्यासाठी उपाययोजना आवश्यक असल्याने जलसंपदा विभागाचे कोंकण प्रदेश मुख्य अभियंता श्री.मिलींद नाईक हिवाळी अधिवेशन संपताच रत्नागिरी जिल्हा दौरा करणार असून जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा घेणार आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील अपुर्ण असलेले सिंचन प्रकल्प पुर्ण करुन सर्व सामान्य माणसाला पाणी मिळावे हा जलसंपदा विभागाचा मूळ हेतू असून सिंचन प्रकल्पाच्या माधम्यातुन जिल्हा टॅकरमुक्त व्हावा आणि सिंचन क्षेत्र वाढून शेतीला पाणी देणाचा मुळ हेतू आहे. प्रकल्पक्षेत्रातील पाणीसाठ्यामुळे परीसरातील शेती ओलीताखाली आणून शेतक-यांसह शहरांनाही मुबलक पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी जलसंपदा विभाग प्रयत्नशील आहे. त्यासाठी जलसंपदा विभाग काम करत असून रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे.
कोकण प्रदेश जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता श्री. मिलींद नाईक यांनी पदभार स्विकारल्यापासून रत्नागिरी जिल्ह्यातील प्रकल्पांचा कार्यालयीन आढावा घेण्याचे सत्र सुरुच आहे मात्र मुख्य अभियंता श्री. नाईक प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी जावून पाहणी करणार आहेत. संगमेश्वर तालुक्यातील गडनदी प्रकल्पात सध्या पाणीसाठा ८२.२१९आहे धरणाचे काम पुर्ण असून कालवे २७ टक्के पुर्ण करण्यात आले आहेत तर गडगडी प्रकल्पात सध्यस्थितीतील पाणीसाठा ३.८९८ एवढा आहे या प्रकल्पाचे काम ५० टक्के झाले असून उर्वरीत काम सध्या बंद स्थितीत आहे.
चिपळूण तालुक्यात जलसंपदाचे कुडुप व मोरवणे हे दोन प्रकल्प आहेत त्यापैकी कुडुप धरणाचे अद्याप काम सुरु झालेले नाही तर मोरवणे धरणाचे काम १०० टक्के पुर्ण झाले आहे मोरवणे प्रकल्पाच्या कालव्यांचे ९० टक्के काम करण्यात आले आहे .
खेड तालुक्यात जलसंपदाचे सहा प्रकल्प आहेत त्यापैकी पिंपळवाडी आणि कोंडीवली धरण प्रकल्प १०० टक्के पुर्ण झाले असल्याची माहीती पाटबंधारे विभागाने दिली आहे तर तळवट धरण प्रकल्प सध्याची स्थिती धरणाचे ९५ टक्के काम पुर्ण ,कालव्याचे काम २५ टक्के झाले आहे ,शेलारवाडी धरणाचे काम ९० टकके , कालवा १० टक्के तर सांडवा ९० टक्के पुर्ण.पोयनार धरण प्रकल्पाचे काम ५० टक्के , सांडवा २० टक्के तर कालव्याचे काम अद्याप नाही .खेड मधील सहावा धरण प्रकल्प न्यु मांडवे हा ४० पुर्ण आहे , कालवा २० टक्के , सांडवा २० टक्के काम पुर्ण असल्याची माहीती देण्यात आली आहे.
दापोली तालुक्यात जलसंपदाचे एकुण ४ प्रकल्प आहेत त्या पैकी पंचनदी ,टांगर , आवाशी हे तीन प्रकल्प पुर्ण केले आहेत तर शिरसाडी प्रकल्पाचे ८० टक्के काम पुर्ण केले आहे कालव्यांची कामे ५० टक्के पुर्ण आहेत .पंचनदी धरण प्रकल्पाच्या सांडव्याचे काम ९० टक्के झाले आहे , कालवा ही ९० टक्के पुर्ण .टांगर धरणाचे कालवे ७० टक्के आणि सांडवा ५० टक्के पुर्ण असल्याची माहीती विभागिय कार्यालयाकडुन देण्यात आली.
मंडणगड तालुक्यातील भोळवली धरणाचे काम ८० टक्के पुर्ण केले आहे आणि पणदेरी धरणाचे १०० टक्के काम पुर्ण केले आहे भोळवली धरणाचे कालवे १० टक्केच झाले आहेत या धरणाचे सांडव्याचे काम ही ८० टक्के केले आहे .राजापुर तालुक्यातील काकेवाडी धरण प्रकल्प १०० टक्के पुर्ण असुन अन्य दोन प्रकल्पांची कामे अपुर्ण स्थितीत आहेत त्यामध्ये जामदा आणि चव्हाणवाडी या दोन प्रकल्पांना अद्याप गतीचं मिळालेली नाही जामदा चे काम 25 टक्के तर चव्हाणवाडी धरणाचे ५० टक्के कामचं पुर्ण होउ शकले आहे.राजापुर प्रमाणे लांजा तालुक्यात ही दोन प्रकल्पांची कामे अद्याप अपुर्ण स्थितीत आहेत त्यापैकी ओझर ८० टक्के तर हसोळ ( आसगा ) ४० टक्केचं काम पुर्ण होवू शकले आहे



