धामणंद परिसर आणि खोपी परिसरातील 255 गरजू, होतकरू, आर्थिक दृष्ट्या मागास/वंचित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम चे आयोजन

खेड – महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, रत्नागिरी जिल्हा टिम च्या पुढाकाराने खेड तालुक्यातील अठरा गाव परिसर, धामणंद परिसर आणि खोपी परिसरातील 255 गरजू, होतकरू, आर्थिक दृष्ट्या मागास/वंचित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रम ला संघटनेचे कोकण विभाग अध्यक्ष इंजि.अनिलसर झोरे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना स्वतः कशा पद्धतीने खडतर मार्गाने, अतिशय मेहनत, चिकाटीने शिक्षणाच्या जोरावर झोपडपट्टी ते न्युझिलंड असा प्रवास केला ते सांगून शिक्षणा शिवाय यशाचा मार्ग नाही असे अतिशय प्रभावी पणे मांडले. त्याचबरोबर शिक्षणाच्या जोरावर भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ह्यांनी केवळ स्वतःच्या आयुष्यात अमूलाग्र बदल करून थांबले नाही तर आपल्या आजूबाजूला असणाऱ्या पीडित, वंचित, गरीब लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी अखंड आयुष्य खर्ची घातले ह्याचा दाखला देऊन हेच काम आपल्या तरुणांना करून देशाला नवीन उंचीवर घेऊन जायचे आहे.
त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना तुम्हांला जे आवडते त्यात सातत्य, चिकाटी आणि नियमितपणे मेहनत करायला सांगून सोबत मोबाईल, टीव्ही सारख्या आकर्षण पासून किमान विद्यार्थी दशेत तरी लांब राहण्याचा सल्ला दिला.
तुम्ही तुमच्या परिस्थितीला, आजूबाजूला घडत असणाऱ्या वाईट गोष्टीना च्या विरुद्ध चीड निर्माण करून त्यातून बाहेर पडण्यासाठी नेहमीच स्वतःला प्रेरणा दिली पाहिजे. शेवटी त्यांनी विद्यार्थ्यांना धनगर ST आरक्षण न्यायलयीन लढा आणि त्याचे महत्व हे देखील पटवून देऊन समाज जागृती केली.
त्याचप्रमाणे खोपी येथे जेष्ठ नागरिक लक्ष्मण बर्गे ह्यांनी आपले मनोगत मांडताना
आजच्या काळात एकाच घरात राहून एकमेकांना काही द्यायला भावंडे तयार होत नसताना, इंजि. अनिल झोरे हे मुंबई वरून इतकी मोठी शैक्षणिक मदत देतायत कारण कुठेतरी त्यांनी गरिबीचे चटके सहन केले असणार आणि समाजाच्या प्रति तळमळ असल्यामुळेच करतायत त्यामुळे तुम्ही मुलांना त्यांच्या प्रमाणे यशस्वी होऊन आपल्या लोकांना मदत केले पाहिजे, असा वडीलकीचा सल्ला दिला.
बिजघर येथे समीर आखाडे ह्यांच्या निवासस्थानी 69 विद्यार्थ्यांना, धामणंद येथे अनंत जानकर ह्याच्या निवास स्थानी 75 विद्यार्थ्यांना आणि खोपी येथे खरावते ह्यांच्या येथे 111 विद्यार्थ्यांना वह्या, पेन्स, पुस्तके, दफ्तरे अशा वेगवेगळ्या शैक्षणिक साहित्याचे वाटप एकूण 255 विद्यार्थ्यांना करण्यात आले.
सदर साहित्य वाटप ला विशेष सहकार्य मुंबईस्थित बरेच दानशूर मंडळी,एज्युकेशन सपोर्ट वॉरिअर, ज्ञानमंदिर हायस्कुल -घाटकोपर आदींनी स्वेच्छेने योगदान दिले होते.
सदर कार्यक्रमाचे नियोजन जिल्ह्याध्यक्ष रामचंद्र आखाडे ह्यांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने करून यशस्वी करण्यासाठी शेवटपर्यंत पप्यादादा आखाडे, संतोष आखाडे, दिपक शांताराम जानकर,अनंत जानकर, शंकर खरावते,संगीता झोरे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.



