आपला जिल्हाआरोग्य व शिक्षण

बालविद्यार्थी आणि दीव्यांग बांधव यांच्यासोबत साजरा केला वाढदिवस ;उद्योजक चंद्रकांत भोजने यांचा वाढदिवस अनोख्या उपक्रमाने साजरा

चिपळूण प्रतिनिधी - ओंकार रेळेकर

चिपळूण – कोकणातील प्रतिष्ठित उद्योगपती तथा चिपळूण मधील एसीबी इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक चंद्रकांत भोजने यांचा ५९ वा वाढदिवस मंगळवारी इंडियन सायंटिफिक एज्युकेशन सोसायटी संचलित एसीबी इंटरनेशनल स्कूल मध्ये बालविद्यार्थी आणि दीव्यांग बांधव यांच्यासोबत साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त श्री.भोजने यांना आशीर्वाद देण्यासाठी दापोली मधील हर्णे पाजपंढरी आणि चिपळूण मधील दिव्यांग बांधव यांची उपस्थिती आणि बालकांचा जल्लोष हेच वाढदिवसाचे मुख्य वेगळेपण होते.

*संपूर्ण* चिपळूण तालुक्यात अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या कापसाळ गावी निसर्गरम्य वातावरणात असलेल्या इंडियन सायंटिफिक एज्युकेशन सोसायटी संचलित एसीबी इंटरनेशनल स्कूलच्या छोटेखानी सभागृहात आयोजित वाढदिवस कार्यक्रमाला उद्योजक चंद्रकांत भोजने, गणेश नागरी पतसंस्थेचे चेअरमन श्री.चिले
सामाजिक कार्यकर्ते बाबुराव भालेकर, बाळा पंदिरे,संजय कांबळे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष जयंत खताते,इंडियन सायंटिफिक एजयुकेशन सोसायटीचे व्हाईस चेअरमन सौ . सुवर्णा भोजने चिपळूण पंचायत समिती सदस्य आबु ठसाळे, खेर्डी ग्रामपंचायत सदस्य रियाज खेरटकर, तरुण उद्योजक शुभम खताते, अभिजीत खताते ,शाहीद खेरटकर,दिव्यांग समन्वय समितीचे आशोक भुस्कुटे,आश्र्विनी भुस्कुटे ,कैसर देसाई आदि मान्यवर या वेळी उपस्थित होते.चंद्रकांत भोजने यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला शाळेला दिल्ली बोर्डाच्या सीबीएसई दर्जाच्या शिक्षण आभ्यासक्रमांचे नामांकन मिळाले आहे.भोजने साहेबांच्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर आज घोषणा करताना
आज आम्हाला खूप आनंद होत आहे असे अँड.अमोल भोजने यांनी या वेळी सांगितले. शाळेतील विविध वर्गातील मुलांनी आपल्या छोटेखानी भाषणातून चंद्रकांत भोजने यांना शुभेच्छा दिल्या. एसीबी इंटरनॅशनल स्कुलच्या चेअरमन सौ.सायली अमोल भोजने संचालक अँड.अमोल चंद्रकांत भोजने,संचालक सौ.पूजा शुभम खताते, गुणवत्ताधिकारी नेहा महाडिक,मुख्याध्यापक राकेश भुरण,पर्यवेक्षक मुकुंद ठसाळे, क्रीडा शिक्षक अमित पांचाळ, समन्वयक ओंकार रेळेकर ,संतोष पिलके,आदेश चीले,निलेश महाडिक,रणजित भोजने यांनी वाढदिवस कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

फोटो : दिव्यांग समन्वय समिती दिव्यांग बांधवांच्या वतीने चंद्रकांत भोजने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अशोक भुस्कुटे,अश्विनी भुस्कुटे आणि दिव्यांग बांधव छायाचित्रात दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर)

Related Articles

Leave a Reply

Back to top button