येडगेवाडी बीएसएनएल मोबाईल टॅावर वर्षभरात जनसेवेत रुजू; बीएसएनएल टॅावरवरुन नेटवर्क सुविधा सुरु

संगमेश्वर – तालुक्यातील कुटगिरी येडगेवाडी या ठिकाणी नेटवर्क समस्या निर्माण होत होत्या कोरोना काळात गावाकडे आलेल्या चाकरमान्यांच्या वर्क फॅार्म होम आणि कॅालेज च्या तरुण, तरुणींच्या ॲानलाईन लेक्चर साठी नेटवर्क सुविधा मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती ही बाब लक्षात घेवून राजिवली ग्रामपंचायत माजी उपसरपंच संतोष येडगे यांनी भारत संचार निगम लिमिटेड विभागाकडे सक्षम पाठपुरावा करुन मोबाईल टॅावर मंजूर करुन घेतला या टॅावर चे भूमिपूजन १ एप्रिल २०२४ रोजी गावातील जेष्ठ नागरीकांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. वर्षभरात टॅावर चे काम पुर्ण करुन एप्रिल २०२५ ला हा मोबाईल टॉवर जनतेच्या सेवेत रुजू होवून या टॅावरवरुन प्रत्यक्ष नेटवर्क सुविधा सुरु करण्यात आली आहे. कुटगिरी गावासह परीसरातील ग्रामस्थांची गैरसोय दूर झाल्याने स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
कुटगिरी येडगेवाडी येथील मोबाईल टॉवर ला सोलर पॅनल ने जोडले आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात विद्युत पुरवठा खंडित झाला तरी हा टॅावर सुरु राहणार आहे.
कुटगिरी येडगेवाडी येथील नेटवर्क समस्या गांभीर्याने घेवून या मोबाईल टॅावर ची सेवा विहीत मुदतीत सुरु होण्यासाठी भारत संचार निगम लिमिटेड चे रत्नागिरी कम्युनिकेशन अधिकारी उमेश शिरसाट यांच्या सह वरीष्ठ अधिका-यांनी विशेष लक्ष देत काम पाहीले.येडगेवाडी येथील मोबाईल टॉवर चे काम विहीत कालावधीत पूर्ण करुन त्यावरुन स्थानिकांना नेटवर्क सुविधा उपलब्ध करुन दिल्याने माजी सरपंच संतोष येडगे यांनी अधिकाऱ्यांचे आभार मानले.



