महाराष्ट्र

चर्चगेट रेल्वे स्थानकाच्या बाहेर लागलेल्या अनाधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी – रासप जिल्हाध्यक्ष सुरेश येडगे

रात्रीच्या अनाधिकृत फेरीवाल्यांमुळे पाकिटमारांची वाढली संख्या

मुंबई – ए विभाग हद्दीतील चर्चगेट स्थानकाच्या पदपथावर रात्री खाण्याचे अनाधिकृत धंदे लागत असतात अनेक वेळा प्रवाशांना जाण्यायेण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे. चर्चगेट स्थानकाच्या बाहेर शेगडी व गॅस लाऊन सर्रास अनाधिकृतपणे फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. अनेक वेळा नागरिकांनी व प्रवास्यांनी तक्रार केल्या तरीही अधिकऱ्यांकडून ठोस कारवाई केली जात नाही. रात्रीच्यावेळी अनाधिकृत धंद्यावर महापालिका व पोलीस प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी राष्ट्रीय समाज पक्ष दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष सुरेश येडगे यांनी पत्राद्वारे केली आहे..

चर्चगेट स्थानक हे पश्चिम रेल्वे स्थानक मधील मुख्य स्थानक असल्याने खूप मोठ्या प्रमाणात प्रवाशांची व नागरिकांची गर्दी असते व सध्या गणपतीच्या वेळी गर्दी वाढून काही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे. यामुळे या हद्दीतील ए विभाग महापालिका व स्थानिक पोलिस स्थानक यांनी अनाधिकृत फेरीवाल्यांवर त्वरित कारवाई करावी.

न्यायालयाच्या आदेशानुसार शाळा कॉलेज, मंदिर, हॉस्पिटल व रेल्वेच्या १०० मीटर जवळ अनधिकृत फेरीवाल्यांना मनाई आहे. परंतु ए विभागातील चर्चगेट स्थानकाच्या पदपथावरील रात्रीचे अनधिकृत फेरीवाले वाढले असून रस्त्यावरून व पदपथावरून प्रवाशांना चालण्यास त्रास होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या रुग्णवाहिका, अग्निशमन वाहनांना यातून वाट काढताना मोठी कसरत करावी आहे. वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, अंध, अपंग नागरिक व प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. व रात्रीच्यावेळी रेल्वेच्या बाहेर शेगडी व गॅस वापरुन अनधिकृतपणे धंदे केले जात आहेत यामुळे आग लागून अनुचित प्रकार घडू शकतो. या ठिकाणी मारहान व हत्या ही करण्यात आलेली आहे. यामुळे असे अनेक वेळा दारू व नशा करून मारहाण होत असते यामुळे स्थानिक नागरिक व प्रवाश्यांच्या मनात भीती निर्माण झाली.

न्यायालयाच्या आदेशानुसार या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई पालिकेने करावी.

अनेक वेळा या पदपथावरून जात असताना या अनधिकृत फेरीवाल्यांमुळे गर्दुल्ले वाढत आहे. अनेक वेळा या ठिकाणी पाकिटे मारताना निदर्शनास येत आहे. यामुळे ये – जा करताना धोका निर्माण झाला आहे. यामध्ये गणेशोत्सव काळात गर्दी वाढून गर्दुल्ले प्रवाशांची पाकीटमार होऊ शकते. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून अनधिकृत फेरीवाले यांच्यावर महापालिका व स्थानिक पोलिस ठाणे यांनी कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्ष दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष सुरेश येडगे यांनी आपल्या पत्राद्वारे महापालिका व पोलीस प्रशासन यांना केली आहे.

चर्चगेट स्थानक हे मुख्य स्थानक असल्याने या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी असते अनेक वेळा या ठिकाणी गर्दुल्ल्यानी पाकीटमार व दारू पिऊन या ठिकाणी झोपलेले असतात यामुळे प्रवाशांच्या मनात घबराट निर्माण झाली आहे. रात्रीच्या अनाधिकृत फेरीवाल्यांवर महापालिका व पोलीस प्रशासनाने ठोस कारवाई करावी.

सुरेश येडगे – दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष – राष्ट्रीय समाज पक्ष

तक्रार प्राप्त होताच आमची कारवाई चालू आहे. ठोस कारवाई करण्यात येईल. जयदीप मोरे – सहाय्यक आयुक्त – ए विभाग

आम्ही रोज कारवाई करत आहोत. आणि येऊ घातलेल्या गणेशोत्सव मध्ये गर्दीच्या वेळी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आम्ही याचीही दक्षता घेतली आहे. चर्चगेट स्थानकला दिवस व रात्री या दोन्ही वेळेस पोलीस गाडी उभी असते.
नितीन तडाखे – वरिष्ठ पोलीस निरीक्षक – आझाद मैदान

Related Articles

Leave a Reply

Back to top button