आपला जिल्हा

आमदार शेखर निकम यांच्या हस्ते सावर्डे गावातील मुंबई- गोवा हायवे च्या स्ट्रीट लाईट चे उदघाटन

चिपळूण प्रतिनिधी - विलास गुरव

चिपळूण – मुंबई -गोवा महामार्ग सावर्डे गावातून जात असल्याने सावर्डे गावातील महामार्गला दुतरफा स्ट्रीट लाईट लावणे गजेचे होते परंतु काही कारणास्तव उशीर होत होता परंतु सावर्डे गावचे उपसरपंच जमीर मुल्लाजी, सूर्यतकांत चव्हाण यांनी निश्चय केला काही झाले तरी गणेश उत्सवात गावातील स्ट्रीट लाईट लागलेच पाहिजे. आमदार शेखर निकम साहेब यांचा मार्गदर्शनाखाली सर्व यंत्रणा कामा ला लावून पंधरा दिवसात लाइटी चे पोल उभे करण्यापासून ते लाईट लागे पर्यंत सर्व सहकार्य केले. या कामासाठी MSEB चे लवेकर साहेब, अशोक काजरोळकर साहेब, पवार साहेब, राष्ट्रीय महामार्ग चे शाम खुणेकर साहेब,इगल कंपनी चे जयंती भाई, प्रेम कुमार, रुपेश कांबळे, राहुल शेलार यांनी सर्वतोपरी सहकार्य केले.
चिपळूण संगमेश्वर चे आमदार शेखर निकम साहेब , MSEB चे लवेकर साहेब यांचा हस्ते स्ट्रीट लाईट चे उदघाटन करण्यात आले. या वेळी सावर्डे गाव चे उपसरपंच जमीर मुल्लाजी, MSEB चे अशोक काजरोळकर. MSEB चे पवार साहेब, इगल कंपनी चे प्रेम कुमार, रुपेश कांबळे,ग्रा प सदस्य बाळुशेठ मोहिरे, ग्रा. प सदस्य मैनू खलपे अजित कोकाटे, सूर्यकांत चव्हाण, विष्णू पंत सावर्डेकर, शौकत भाई माखजणकर, तौसिफ़ खलपे, भालचंद्र सावंत, सुभाष सावंत, गुलाबराव सुर्वे, सुमित कुमार पाटील सर, आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button