आपला जिल्हा

राजिवली माजी सरपंच, माजी उपसरपंचानी घेतली शिवसेना ( उबाठा ) पदाधिका-याची भेट ; बीआरएस नंतर शिवसेना ( उबाठा ) पदाधिका-यासोबत फोटो व्हायरल

संगमेश्वर – तालुक्यातील राजिवली ग्रामपंचायत माजी सरपंच आणि माजी उपसरपंच यांनी शिवसेना ( उबाठा ) गटाच्या तालुका स्तरीय पदाधिका-याची भेट घेतल्याने पंचक्रोशीत चर्चेचा विषय बनला आहे. शिवसेना फुटीनंतर शिंदे गट भाजप सोबत जावून युतीत मिळाला तर शिवसेना ( उबाठा ) राज्यात स्वतंत्र काम करत आहे मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील भाजप च्या कार्यकर्त्यांनी माजी आमदार सुभाष बने यांचे कट्टर समर्थक असणा-या शिवसेना ( उबाठा ) गटाच्या तालुका स्तरीय पदाधिका-याची भेट घेतल्याने पंचक्रोशीत राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत.

शिवसेना ( उबाठा ) गटाच्या पदाधिका-याची भेट घेणा-या माजी सरपंच आणि माजी उपसरपंच यांना ११ मे २०२३ रोजी रत्नागिरी लाचलुचपत विभागाने प्रत्येकी १५ हजाराची लाच घेताना पकडले होते त्यानंतर त्यांना कोकण आयुक्तांनी अपात्र घोषीत करत सरपंच आणि उपसरपंच पदावरुन काढून टाकले होते.

राजिवली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच यांचा मधल्या काळात बीआरएस पक्षात प्रवेश झाल्याचा फोटो व्हायरला झाला होता त्यानंतर त्या उपसरपंचानी जनतेसमोर कोणतेही स्पष्टीकरण दिले नव्हते त्यातच आता शिवसेना ( उबाठा ) गटाच्या तालुका स्तरीय पदाधिका-यासोबत फोटो व्हायरल झाल्याने हे राजकीय परीवर्तन  आहे का असा सवाल जनतेला पडू लागला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button